शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जुने वाडे करणार निर्मनुष्य :  धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:37 IST

जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे असलेल्या मिळकती वगळून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

नाशिक : जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे असलेल्या मिळकती वगळून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.  दरवर्षी महापालिकेच्या वतीने शहरातील गावठाण भागातील धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावल्या जातात. आपल्या मिळकतीचा धोकादायक भाग उतरवून घ्यावा अन्यथा होणाऱ्या आपत्तीस संबंधित नागरिकच जबाबदार राहतील, अशा आशयाच्या या नोटिसा असल्या तरी संबंधित वाडेमालक धोकादायक भाग उतरवून घेत नाही. त्यातच रविवारी जुन्या तांबट आळीतील काळे यांचा वाडा पडल्याने दोन जण ठार झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ही भूमिका घेतली आहे. महापालिका हद्दीत ३९७ धोकादायक वाडे आहेत. महापालिका त्यांना पारंपरिक पद्धतीने नोटिसा बजावत असते. परंतु तरीही नागरिक घर सोडत नाहीत. एप्रिल-मे महिन्यात होणाºया धोकादायक घरांच्या सर्वेक्षणानंतर बांधकाम विभाग नोटिसा देण्यास विभागीय अधिकाºयांना कळवत असते. परंतु तरीही नागरिक हटत नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून हाच प्रकार सुरू आहे. धोकादायक घरांना डागडुजी करूनही नागरिक राहात नाहीत, असे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता यातील घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणे असतील तर ती सोडून ही कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता पोलिसांच्या मदतीनेच धोकादायक घरातील नागरिकांना बाहेर काढण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेच्या इतिहासात धोकादायक घरांच्या बाबतीत प्रथमच इतकी कठोर भूमिका घेतली जात आहे. तथापि, बहुतांशी नगरसेवकांनीदेखील या मोहिमेचे स्वागत केले आहे. जीव गमविण्यापेक्षा महापालिकेच्या कार्यवाहीच्या निमित्ताने घर रिकामे होणे महत्त्वाचे असल्याचे मत नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी व्यक्त केले.काजीगढीच्या रहिवाशांनादेखील सूचनामहापालिकेच्या वतीने विविध धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची मोहीम राबविण्यात येणार असली तरी धोकादायक काजीच्या गढीबाबत नागरिकांनी स्वत:हून बाहेर पडण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. काजीगढी दर पावसाळ्यात घसरत असते. गेल्या तीन ते चार वर्षांत अशाप्रकारे काजीगढी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे आता तेथेदेखील कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका