शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांवर जरब बसण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:37 IST

बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडासह दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव असणारे फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. ते लवकरच संमत होण्याची शक्यता आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य आता शासन पातळीवर घेतले जात असल्याचे दिसते. हा निर्णय चांगला असून, त्याचे कठोरपणे पालन केले जावे. विकृतींना जरब बसावा अशी अपेक्षा वकील, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचारतज्ज्ञ यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक : बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडासह दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव असणारे फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. ते लवकरच संमत होण्याची शक्यता आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य आता शासन पातळीवर घेतले जात असल्याचे दिसते. हा निर्णय चांगला असून, त्याचे कठोरपणे पालन केले जावे. विकृतींना जरब बसावा अशी अपेक्षा वकील, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचारतज्ज्ञ यांनी व्यक्त केली आहे. याबाबत विविध प्रतिनिधींशी साधलेला हा संवाद. हा अत्यंत चांगला निर्णय आहे. कायद्याचा धाक असल्याशिवाय हे विकृत लोक सुधारणार नाहीत. या गोष्टीला आळा बसलाच पाहिजे. असे प्रकार होऊ नये यासाठी वेळोवेळी प्रबोधनही केले जाते, पण अशा घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे आता कायद्याची भीती तरी लोकांना वाईट कृत्यांपासून थांबवेल.  - डॉ. हेमलता पाटील, नगरसेवकधोरणात्मक बाब म्हणून हा निर्णय योग्य आहे. पण आजच्या युगाला तो साजेसा नाही. कारण एकाला फाशी झाली म्हणून दहा जण घाबरतील, असा जमाना आता राहिलेला नाही. आजच्या निर्ढावलेल्या विकृत मानसिकतेला वेगळ्या शिक्षेची गरज आहे. लोकांची मानसिकता बदलत चालली आहे. तिला जरब बसेल, असे कठोर कायदे आता झाले पाहिजे.  - अमोल कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञफाशीची शिक्षा हा प्रकारच हास्यास्पद वाटतो. अशा प्रकारच्या गंभीर घटनांनंतर गुन्हेगार आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावणारे हे दोघेही सारखेच गुन्हेगार वाटतात. कारण फाशीची अंमलबाजवणी काही लवकर होत नाही. घटनेचे गांभीर्य राहत नाही. त्यापेक्षा महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंदविले जातील याचा आग्रह धरला पाहिजे. या घटनेमुळे बाईच्या चारित्र्याला डाग लागला, काचेचे भांडे फुटले असे अतिरंजित वातावरण तयार करणे थांबविले पाहिजे.  - अनिता पगारे, सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस