नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे काम घेण्यासाठी शासकीय नियमानुसार बँकेत भरलेली अनामत रक्कम परत मिळण्यासाठी आवश्यक असलेली रिलीज आॅर्डर तसेच रस्त्याच्या देखभालीचे कामाचे बिल देण्यासाठी ठेकेदाराकडे दीड लाख रुपयांची मागणी करून एक लाख रुपयांची लाच घेणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांना मंगळवारी सायंकाळी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत एसीबीचे अधिकाऱ्यांकडून त्यांच्या घराची झडती तसेच चौकशी सुरू होती़ तक्रारदार गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांची रस्ता बांधकामाची फर्म आहे़ पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत २००९-१० मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार गावांच्या रस्त्याचे मातीकाम, डांबरीकरण तसेच या रस्त्याचा पुढील पाच वर्षांचा देखभाल व दुरुस्तीचे काम घेतलेले होते़ या कामासाठी शासकीय नियमानुसार बँक आॅफ बडोदा शाखेत ३३ लाख रुपयांची अनामत (बँक गॅरंटी) म्हणून जमा केलेली होती़ या रस्त्याचे काम १५ फेब्रुवारीला पूर्ण झाल्याने अनामत रक्कम परत मिळण्यासाठी रिलीज आॅर्डर काढणे, डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या देखभालीचे शेवटच्या वर्षाचे बिलाची रक्कम मिळावी यासाठी संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या प्रतिनियुक्तीवर आलेले संजय दगडू दशपुते यांच्याकडे विनंती केली होती़
कार्यकारी अभियंता दशपुते एसीबीच्या जाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभाग : ठेकेदाराकडे एक लाखाची मागणी
By admin | Updated: April 8, 2015 01:31 IST