शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उद्््घाटनाआधीच मुकणे कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:54 IST

शहरासाठी राबविण्यात आलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर त्याचे अनुषंघिक काम झाल्यानंतर ती तातडीने कार्यान्वित करण्यात येणार असून निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही लोकार्पण सोहळे न करताच योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन धावपळ करीत आहे.

नाशिक : शहरासाठी राबविण्यात आलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर त्याचे अनुषंघिक काम झाल्यानंतर ती तातडीने कार्यान्वित करण्यात येणार असून निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही लोकार्पण सोहळे न करताच योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन धावपळ करीत आहे.नाशिक शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने मुकणे धरणातून थेट जलवाहिनीची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत नाशिक शहरापासून सोळा किलोमीटर दूर असलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. सदरची योजना गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात पूर्णत्वास येणे आवश्यक होते. परंतु काम अपूर्ण असल्याने मुख्य म्हणजे मुकणे धरणात पाणी असल्याने जलविहिरीचे काम रखडले होते. त्यानंतर विल्होळीपर्यंतच जलवाहिनीचे काम रखडले होते तेदेखील पूर्ण होणे बाकी होते. ते पूर्ण झाल्यानंतरदेखील अनेक अनुषंगिक कामे बाकी होती. ती पूर्ण करण्यात बराच वेळ गेला. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी डिसेंबर महिन्यात योजनेची पाहणी केल्यानंतर मार्च महिन्यात प्रत्यक्ष धरणातून पाणी आले पाहिजे, असे संबंधित ठेकेदारास बजावले होते. त्यानंतर योजना पूर्ण झाली आणि धरणातून पाण्याचा उपसा करून पाइपलाइनमध्ये कुठे गळती आहे काय किंवा अन्य त्रुटी शोधण्याचे काम सुरू होते.बुधवारी (दि. १३) रात्री सदरचे पाणी विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर या केंद्राची चाचणीदेखील करण्यात आली. परंतु कोठेही कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही. त्यामुळे योजनेची यशस्वीरीत्या चाचणी झाली आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजनेवर ताण वाढत असून, पाणीपुरवठा कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे माजी शहर अभियंता सुनील खुने, उत्तम पवार, अधीक्षक अभियंता रमेश पवार या माजी अधिकाऱ्यांबरोबरच विद्यमान अभियंता शिवाजी चव्हाणके, अ. वि. धनाईत, सी. बी. आहेर अशा अनेक अधिकाऱ्यांनी त्यासाठी काम पाहिले आहे.तथापि, स्काडा मीटर बसविणे आणि अन्य जोडणीची कामे करण्यासाठी कालावधी लागणार आहे. ते झाल्यानंतर सुमारे पंधरा ते वीस दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याची महापालिकेची तयारी सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी