चांदवड : वीज वितरण कंपनीचे घरगुती वीजबिल माफ करण्याची मागणी तहसीलदार प्रदीप पाटील व वीज वितरण कंपनीचे अभियंता यांच्याकडे चांदवड तालुका कॉँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष चंद्रभान साळवे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बागुल यांनी निवेदनाद्वारे केली आहे.कोरोना विषाणू या आजाराने मार्च महिन्यापासून थैमान घातले आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यापार, व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे मातंग समाज व इतर समाजावर उपासमारीची वेळ आली असून, हातात पैसा नसल्यामुळे कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच आर्थिक आवक नसल्याने व आर्थिक परिस्थिती खालावल्याने लोकांना जगणे मुश्किलीचे झाले आहे. यासाठी वीजबिल व पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर पंढरीनाथ साळवे, गणेश राजगिरे, नाना साळवे, दत्ता साळवे, सुरेश साळवे, आनंदा धोतरे, दिलीप पवार, छगन हिरे, म्हसू कापसे, केदू कापसे, दीपक ढोमसे, अनिल साळवे आदींसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वीजबिले माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:26 IST