शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री दिनाचा उत्साह मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:56 IST

दरवर्षीप्रमाणे ‘मैत्री दिन’ यंदा शहरात साजरा होताना अनुभवयास आले नाही. कोरोनाच्या सावट असल्यामुळे तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियावर सचित्र उजाळा देणे पसंत केले. कॅफे, रेस्टॉरंट, उद्याने, पर्यटनस्थळे सर्वच ठिकाणी सामसूम असल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देतरुणाईचा हिरमोड : कॅफे, रेस्टॉरंट बंदीमुळे सामसूम

नाशिक : दरवर्षीप्रमाणे ‘मैत्री दिन’ यंदा शहरात साजरा होताना अनुभवयास आले नाही. कोरोनाच्या सावट असल्यामुळे तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियावर सचित्र उजाळा देणे पसंत केले. कॅफे, रेस्टॉरंट, उद्याने, पर्यटनस्थळे सर्वच ठिकाणी सामसूम असल्याचे चित्र होते.महाविद्यालयीन जीवनात कट्ट्यांवरून बहरलेली मैत्री अधिकाधिक दृढ होत जाते. मैत्रीचे बंध कायमस्वरूपी टिकून रहावे, यासाठी दरवर्षी आॅगस्टच्या पहिल्या रविवारी आपल्या मित्रपरिवारासोबत तरुणाई एकत्र येत जल्लोष करत असते; मात्र यावर्षी तरुणाईचा मैत्री दिनाचा उत्साह कोरोनामुळे पूर्णपणे मावळल्याचे दिसून आले.असा सूर गोदापार्क परिसरात एकत्र आलेल्या काही तरुणांच्या ग्रुपमधून उमटला. एरवी मैत्री दिनाला कॉलेजरोड, गंगापूररोड, सोमेश्वर मंदिर परिसर, दूधस्थळी धबधबा, फाळकेस्मारक, पांडवलेणी, नेहरू वनोद्यान, अंजनेरी, गंगापूर धरण परिसर गजबजलेला पहावयास मिळतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे गु्रप एकत्र येत ‘सेलिब्रेशन’ करतात; मात्र रविवारी (दि.२) तरुणाईच्या पसंतीचे वरील सर्व ठिकाणी निरव शांतता अनुभवयास आली. बोटांवर मोजण्याइतके ग्रुपचा अपवाद वगळता मैत्री दिन साजरा करताना कोणीही दिसून आले नाही.

टॅग्स :NashikनाशिकFriendship Dayफ्रेंडशिप डे