शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी दांपत्य आल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:20 IST

वर्षभरापासून विविध राज्यांचा अभ्यास दौरा करत इंदूर येथून नाशिकरोडच्या उपनगर येथील मातोश्रीनगरमध्ये विदेशी जर्मन दांपत्य आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मनपा व पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व चौकशी करून त्यांची मुंबईला रवानगी केली.

नाशिकरोड : वर्षभरापासून विविध राज्यांचा अभ्यास दौरा करत इंदूर येथून नाशिकरोडच्या उपनगर येथील मातोश्रीनगरमध्ये विदेशी जर्मन दांपत्य आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मनपा व पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व चौकशी करून त्यांची मुंबईला रवानगी केली.जर्मन दूतावासाने जर्मनीचे एक नागरिक व त्यांच्या पत्नीला भारताचा सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक अभ्यासासाठी पाठवले आहे. भारतात कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे संबंधित दांपत्याने जर्मन प्रशासनाला कळवले. जर्मन प्रशासनाने त्यांची मुंबईवरून जर्मनीला येण्याची सोय केली. त्या दांपत्याला त्यांच्या मित्राने नाशिकमार्गे यावे, मग मुंबईला जाता येईल, असे सांगितले. त्यानुसार हे दांपत्य हे बुधवारी (दि. २५) रात्री उपनगर येथील मातोश्रीनगरमध्ये आपल्या मोटारीने आले. सकाळी रहिवाशांनी त्यांना पाहिल्यावर खळबळ उडाली. नगरसेविका सुषमा पगारे व युगांतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी पगारे यांना संबंधितांची माहिती मिळतात त्यांनी तत्काळ मनपा व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दांपत्याची चौकशी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य