देवळाचीपाडा येथे शेतीदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:36 PM2020-10-14T22:36:30+5:302020-10-15T01:38:55+5:30

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील देवळीचापाडा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि एफर्ट या सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला .

In the excitement of Agriculture Day at Deolachipada | देवळाचीपाडा येथे शेतीदिन उत्साहात

देवळाचीपाडा येथे शेतीदिनानिमित्त कार्यक्रमप्रसंगी बी .गीता राणी ,मंडळ कृषी अधिकारी सूयर्वंशी ,कृषी सहायक ठोकळे समवेत शेतकरी.

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षित शेती पद्धती ' विषयावर बी .गीता राणी यांचे व्याख्यान

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील देवळीचापाडा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि एफर्ट या सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी शेतीदिनाचे औचित्य साधून ' सुरक्षित शेती पद्धती ' विषयावर बी .गीता राणी यांचे व्याख्यान आयोजित केले होते .यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की ,दुष्काळामुळे शेतकरी अनेक अडचणित सापडला आहे. पीकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना त्याने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तो जर मजबूत असेल तर अधिक संख्येने लोकांनाअन्न मिळण्यास मदत होईल. तसेच यावेळी कीटकनाशकंची फवारणी करताना काय काळजी घ्यावी? याचे प्रात्यक्षिक करून दाखविन्यात आले. शेती करताना संरक्षक उपकरणांंचा वापर करावा. पीकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना सर्व शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळज़ी आदिंबाबात मार्गदर्शन करण्यात आले.
अन्नदाता असलेल्या शेतक?्याला कोनतेही संरक्षण मिळत नसल्याने त्याने आपल्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले . गावातून कीटकनाशके फवारणी जनजागृति साठी प्रचार फेरी काढ़न्यात आली. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी एल . बी . सुयर्वंशी यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भात पिकातील एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन व एकात्मिक किड व रोगाचे व्यवस्थापन, कृषी विभागाच्या विविध योजना विषयी सविस्तर माहिती दिली. कृषी सहायक एस. एस .ठोकळे यांनी या अगोदर शेतीशाळेबाबत माहिती दिली.

 

 

Web Title: In the excitement of Agriculture Day at Deolachipada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.