नाशिक : नाशिक सायकलिस्टतर्फे आयोजित महिला सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.हॉटेल एमराल्ड पार्कयेथे आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, वैशाली भोसले, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांच्या उपस्थितीत राखी टकले यांच्या हस्ते झेंडा उंचावून रॅलीला सुरु वात करण्यात आली. ही रॅली मायको सर्कल, वेद मंदिर, सावरकर तरण तलाव, रामायण बंगला, राजीव गांधी भवन, कॅनडा कॉर्नर, पुढे जुने पोलीस आयुक्तालय मार्गाने पुन्हा हॉटेल एमराल्ड पार्कयेथे राइड संपली.महिला विविध पारंपरिक वेशभूषेत सामाजिक संदेश असलेले फलक घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाल्या. जलाराम मतिमंद आश्रमशाळेतील चार दिव्यांग मुलींनी राइड पूर्ण करताना तंबाखूमुक्तीचा संदेश दिला.यात सायकल सजावट : सोनाली सुर्वे, हेल्मेट सजावट : परी घुमरे, वेशभूषा : निधी शाह यांना पारितोषिके देण्यातआली.सर्वात जास्त संख्येने सहभागी गट : हिरकणी ग्रुप, हाउज द जोश, रचना विद्यालय.यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य गीता चव्हाण, नाशिक सायक्लिस्टस्चे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, किरण चव्हाण, शैलेश राजहंस, अॅॅड. वैभव शेटे, श्रीकांत जोशी, योगेश शिंदे, रत्नाकर आहेर, विशाल उगले, डॉ. नितीन रौंदळ, रवींद्र दुसाने, चंद्रकांत नाईक, डॉ. मनीषा रौंदळ, नीता नारंग, सोफया कपाडिया, सुकन्या जोशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीता नारंग, श्रेया खाबिया यांनी केले. तर स्नेहल देव यांनी आभार मानले. (12सायकल राइड)
सायकल राइडला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 16:44 IST
नाशिक : नाशिक सायकलिस्टतर्फे आयोजित महिला सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सायकल राइडला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठळक मुद्देयावेळी उत्कृष्ट सायकल सजावट, उत्कृष्ट हेल्मेट सजावट, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट संदेश, सर्वात जास्त संख्येने सहभागी गट अशा विविध गटांत स्पर्धा घेण्यात आल्या.