शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षभरात चार कोटींचा मुद्देमाल जप्त

By विजय मोरे | Updated: December 31, 2018 23:24 IST

नाशिक : जिल्ह्यात चोरी-छुप्या मार्गाने येणाऱ्या अवैध मद्यसाठ्यास प्रतिबंध करण्यास नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागास गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले यश आले आहे़ २०१८ या वर्षभरात तब्बल चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये मद्य तसेच वाहनांचा समावेश आहे, तर यावर्षी सर्वाधिक असे एक हजार २९७ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे़

ठळक मुद्देनाशिक विभाग : गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट कारवाई मद्यचोरी, वाहतुकीचे १२९७ गुन्हे दाखल

नाशिक : जिल्ह्यात चोरी-छुप्या मार्गाने येणाऱ्या अवैध मद्यसाठ्यास प्रतिबंध करण्यास नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागास गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले यश आले आहे़ २०१८ या वर्षभरात तब्बल चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये मद्य तसेच वाहनांचा समावेश आहे, तर यावर्षी सर्वाधिक असे एक हजार २९७ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे़

महाराष्ट्रात दारूवर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात येत असल्याने त्या तुलनेने गुजरातमध्ये कमी कर आकारला जातो़ त्यामुळे पार्ट्यांचे आयोजक गुजरातमधून स्वस्त दारू आणण्याचा प्रयत्न करतात, तर दारूतस्करही गुजरातमार्गे वाहनांमधून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी करतात़ नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने गुजरात व दिव-दमण तसेच सिल्वासामार्गे मोठ्या प्रमाणात कर चुकवून मद्याची चोरटी वाहतूक केली जाते़ राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०१७ मध्ये ९५३ वारस गुन्हे दाखल करून दोन कोटी चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़, तर यावर्षी एक हजार २९७ गुन्हे दाखल करून चार कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ यामध्ये तब्बल ८१ वाहनांचा समावेश असून, गतवर्षीच्या तुलने जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात दोन कोटी सात लाखांची वाढ झाली आहे़

नाशिक विभागातील अवैध पद्धतीने केली जाणारी मद्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष भरारी पथके तसेच सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली, हरसूल, पेठ तालुक्यांतील राजबारी या ठिकाणी सीमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत़कारवाई अशीच सुरू राहणार विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली भरारी पथके, सीमा तपासणी नाके तसेच विभागीय निरीक्षक, दुय्यम निरीक्षक तसेच जवान यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन कारवाई केली आहे़ त्यामुळेच वर्षभरात सुमारे तेराशे गुन्हे व चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले़ नवीन वर्षातही राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई अशीच सुरू राहणार आहे़- चरणसिंग राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक 

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागNashikनाशिक