शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमच्या परीक्षा १० जूनपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 16:04 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेले वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते ३० जूनदरम्यान घेतल्या जाणार आहे. कोरोना संकटामुळे या परीक्षा २३ मार्चपासून रखडल्या होत्या. त्यानंतर १९ एप्रिल आणि २ जूनला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कोरोना संकटामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेले वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते ३० जूनदरम्यान घेतल्या जाणार आहे. कोरोना संकटामुळे या परीक्षा यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, काही विद्यार्थ्यांनी या परीक्षा पुढे न ढकलता ऑनलाईन पद्धतीनने घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाने ही मागणी फेटाळून १० जूनपासून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याच्या सुचना केल्याने आता या परीक्षा १० जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली आहे.विद्यापीठाच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या या परीक्षा सुरुवातीला २३ मार्चपासून सुरू होणार होत्या. परंतु कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलून १९ एप्रिलपासून घेण्याचे पूनर्नियोजन करण्यात आले. मात्र कोरोनाचा प्रभाव आणखीनच वाढल्याने या परीक्षा २ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र दोन जून पासूनही परीक्षा घेण्यास पूरक वातावणर नसल्याने या परीक्षा आणखी पुढे ढकलण्याचे नियोजन सुरू असतानाच विद्यार्थ्यांनी संबधित परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ऑनलाईन परीक्षाची मागणी फेटाळून १० जूनपासून ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बी. एस्सी नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा१० जूनपासून सुरू होणार आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा १६ ऑगस्टपासूनपदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा येत्या १६ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे. उन्हाळी सत्र २०२१ मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय झाला. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित करण्यात आली होती. परंतु, कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकuniversityविद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थी