शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

वन सेवेत थेट दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची वनखात्यांतर्गत 'परीक्षा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 7:56 PM

कोविड १९चा प्रादुर्भावामुळे मागील वर्षी २०२० सालातही वनखात्यांतर्गत परीक्षेला मुहूर्त मिळू शकला नाही. त्यामुळे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत खंड पडला. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार वनखात्याकडून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही परीक्षा विभागनिहाय घेण्यात आली.

ठळक मुद्देपदोन्नतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे असते बंधनकारकनाशिक विभागातून ६६ अधिकारी या परीक्षेसाठी प्रविष्ट नाशिकप्रमाणे प्रत्येक विभागनिहाय ही परीक्षा घेण्यात आली कोविडमुळे गेल्या वर्षी हुकली 'परीक्षा'

नाशिक : वन खात्यात केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (आयएफएस) व राज्य लोकसेवा आयोगामार्फत थेट सेवेत दाखल झालेले उपवनसंरक्षक ते वनक्षेत्रपाल (आरएफओ) दर्जाच्या अधिकाऱ्यांना वनखात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होणे पुढील पदोन्नती व वेतनवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. नाशिक विभागातून वनविभागाच्या ६६ अधिकारी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. रविवारी (दि.१०) परीक्षेचा समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या परीक्षेत तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका अधिकारी वर्गाने सोडविल्या.दरवर्षी राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे नियोजन यंदा वनविभागाकडून करण्यात आले होते. मात्र, परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती व उत्तरपत्रिका या आयोगाकडे पाठविल्या जाणार आहे, तसेच ही 'इन कॅमेरा' पार पडल्याने त्याचे संपूर्ण रेकॉर्डिंगही आयोगाकडेच सादर केले जाणार असल्याची माहिती नाशिक वनविभागाच्या सूत्रांनी दिली. 'जमीन महसूल व गुन्हेगारी कायदे', 'वन कायदे' आणि राज्य वन मार्गदर्शिका नियमावलीवर अधारित प्रोसिजर व अकाउंट या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षार्थ्यांनी निर्धारित प्रत्येकी एक तासात सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विषयाचा पेपर १५० गुणांचा होता. यापैकी उत्तीर्ण होण्यासाठी किमान ७५ गुण गरजेचे आहे.नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधील जे थेट सेवेतून दाखल झालेले अधिकारी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत वनखात्यांतर्गत ही परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही, असे ६६ अधिकारी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. नाशिकप्रमाणे प्रत्येक विभागनिहाय ही परीक्षा घेण्यात आली.कोविडमुळे गेल्या वर्षी हुकली 'परीक्षा'कोविड १९चा प्रादुर्भावामुळे मागील वर्षी २०२० सालातही वनखात्यांतर्गत परीक्षेला मुहूर्त मिळू शकला नाही. त्यामुळे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत खंड पडला. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार वनखात्याकडून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही परीक्षा विभागनिहाय घेण्यात आली. कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल पुढील दोन ते तीन महिन्यांत लागणे अपेक्षित आहे. अत्यंत अवघड व किचकट स्वरूपाची प्रश्नपत्रिका असलेली ही परीक्षा पुस्तकासह घेतली जाते. म्हणजेच विषयाशी निगडित पुस्तक प्रश्नपत्रिका सोडविताना वापरण्याची मुभा परिक्षार्थ्यांना दिली जाते.---

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत, थेट सेवेतून वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून वन खात्यात रुजू झाली आहे. निकषानुसार वनखात्यांतर्गत मी ही परीक्षा दिली. पुस्तकासह ही परीक्षा असली, तरीही तीनही विषयांच्या प्रश्नपत्रिका या अत्यंत अवघड होत्या. दीर्घोत्तरी वर्णनात्मक लेखी स्वरूपात प्रश्नपत्रिका सोडविण्याचे मोठे आव्हान होते. तीन तासांचा वेळही यासाठी कमी पडला.- सीमा मुसळे, परीक्षार्थी, आरएफओ, पेठ

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागexamपरीक्षा