शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एलएलबी द्वितीय वर्ष पुनर्परीक्षेच्या प्रवेशपत्रांचा घोळ, २४ ऑक्टोबरपासून परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:31 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिक मधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र त्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली असून, परीक्षा देता न आल्यास त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देएलएलबी दि्वतीय वर्षाच्या पुनरपरीक्षा प्रवेशपत्रांचा घोळ २४ ऑक्टोबरपासून परीक्षा 205 पैरी 15 विद्यार्थ्यांची अडचण

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिक मधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र त्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली असून, परीक्षा देता न आल्यास त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखा पदवी अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी २०१४ च्या जुन्या अभ्यासक्रमानुसार आॅक्टोबर २०१८ मध्ये पुनर्परीक्षा देत आहेत. त्यांना परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र महाविद्यालयातून प्राप्त करणे अनिवार्य आहे. परंतु नाशिकमधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातून एलएलबी द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा देणाºया २०५ विद्यार्थ्यांपैकी ५७ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाकडून महाविद्यालयाला प्राप्त झालेले नसल्याने विद्यार्थ्यांनाही ते मिळू शकलेले नाही. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाक डून महाविद्यालयांच्या मेल आयडीवर पाठविले जातात. या प्रवेशपत्रांचे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. परंतु महाविद्यालयाला विद्यापीठाकडूनच ओळखपत्र पाप्त झाले नसल्यामुळे महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संपर्क  साधण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर जवळपास ४२ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाकडून पाठविण्यात आले. मात्र त्यानंतरही १५ विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळण्याची प्रतीक्षा कायम असून, या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राअभावी परीक्षा देता आली नाही, तर त्यांचे वर्ष पुन्हा एकदा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

विद्यार्थी संघटना आक्रमक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विधी शाखेच्या द्वितीय वर्ष पदवी पुनर्परीक्षेच्या प्रवेशपत्रांचा घोळ घातल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत असतानाही अद्याप विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांचा घोळ मिटलेला नाही. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाचे अधिकारी योगेश सोनार यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.  

प्रवेशपत्रांच्या वाटपात विद्यापीठाच्या यंत्रणेकडूनच त्रुटी राहिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. - तुषार जाधव, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, नाशिक 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ