शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचाऱ्यांना हवे  २१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:41 IST

महापालिकेच्या वतीने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना चौदा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना चौदा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.  समितीच्या वतीने सफाई कामगारांची बैठक पंडित कॉलनीतील लायन्स क्लब हॉलमध्ये संपन्न झाली यावेळी ही मागणी करण्यात आली. सफाई कामगारांवर होणाºया अन्यायाच्या विरोधात लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रशासनाकडून रोज रोज नवनवीन नियम तयार करून अल्प कामगारांकडून हुकूमशाही पद्धतीने मोठ्या प्रमाणात काम करून घेतले जात असल्याचा आरोप करीत त्याचा निषेध करण्यात आला. सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. बैठकीत सुरेश दलोड, सुरेश मारू, प्रकाश अहिरे, संतोष वाघ, ताराचंद पवार, बाळासाहेब शिंदे, बबल ढकोलिया, रमेश मकवाणा, रंजित कुलकर्णी, सूरजभान डिंग्गीया, जयसिंग मकवाणा आदी उपस्थित होते.कामगार भरती करण्याची मागणीसफाई कामगारांकडून बेकायदेशीररीत्या एक किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा रस्ता झाडून घेणे, बांधकाम आणि उद्यान विभागाची कामे सफाई कामगारांना सांगणे यांसह अन्य कामे सांगितली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच लाड आणि पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांची भरती करावी, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDiwaliदिवाळी