शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

सर्वत्र समान संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:53 IST

राजकारण अधिकतर लाटांवर चालते हे खरेच, पण जेव्हा या लाटा ओसरतात, तेव्हा साºयांना सर्वत्र समान संधी खुणावू लागते. सद्य राजकीय स्थितीत तसेच चित्र असल्याने स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असून, सर्वच राजकीय पक्षांत कमी-अधिक प्रमाणात ही भरती होत असल्याने कुणाला हुरळून जाण्याचे अगर कुणाला चिंताक्रांत होण्याचे कारण नाही.

ठळक मुद्देस्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव आजच्या प्राथमिक अवस्थेत सर्वांना समान संधी

राजकारण अधिकतर लाटांवर चालते हे खरेच, पण जेव्हा या लाटा ओसरतात, तेव्हा साºयांना सर्वत्र समान संधी खुणावू लागते. सद्य राजकीय स्थितीत तसेच चित्र असल्याने स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असून, सर्वच राजकीय पक्षांत कमी-अधिक प्रमाणात ही भरती होत असल्याने कुणाला हुरळून जाण्याचे अगर कुणाला चिंताक्रांत होण्याचे कारण नाही.जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या दोन्ही शहरांचे ‘गावपण’ तसे वेगळे आहे. इगतपुरी हे रेल्वे जंक्शनमुळे नावारूपास आले आहे, तर त्र्यंबकला ज्योतिर्लिंगामुळे ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभला आहे. इगतपुरीत राजकीयदृष्ट्या अलीकडच्या काळात शिवसेनेचा तर त्र्यंबकमध्ये भाजपाचा वरचष्मा राहिलेला दिसून येत असला तरी या दोन्हींच्या मिळून असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या निर्मला गावित करीत आहेत. काही कालावधीनंतर यंदा थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचा असल्याने तर अधिकच उत्साहाचे वातावरण आहे. त्यात नाही म्हटले तरी भाजपाला मध्यंतरी आलेले ‘भरते’ ओसरताना दिसत असल्याने प्रत्येकच राजकीय पक्षाबाबत अनुकूल वा प्रतिकूलता भासावी, अशी स्थिती आहे. त्यामुळेच, संधी जिकडे खुणावेल तिकडे उड्या मारण्याकडे इच्छुकांचा कल दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सर्वच राजकीय पक्षांत भरती-ओहोटीचे प्रमाण मोठे राहिलेले दिसून आले तेही त्यातूनच. अर्थात, कुणी राजी व्हावे किंवा नाराज व्हावे, असेही नाही. शिवसेना, भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादीसह मनसे या साºयांमध्येच कमी-अधिक प्रमाणात पडझड झाली आहे. एक मात्र लक्षात घेता येणारे आहे की, भाजपाचा बोलबाला म्हटला जात असताना या पक्षाचे प्रभावक्षेत्र म्हणविणाºया त्र्यंबकेश्वरमध्ये काही नगरसेवक व खंद्द्या कार्यकर्त्यांनी अन्य पक्षांचा रस्ता धरला आहे. पारंपरिक ‘युती’ अंतर्गत वरचढ होऊ पाहणाºया शिवसेनेत काही जणांनी जाणे हे राजकीय स्वभावधर्माला साजेसे असल्याने समजूनही घेता यावे, परंतु काहीजण काँग्रेसमध्येही गेले आहेत. भलेही संधीच्या शोधात, म्हणजे तिकिटासाठी हे आवागमन झाले असेल, पण गल्ली ते दिल्ली भाजपाच्या चलतीच्या काळात काँग्रेसला असे ‘अच्छे दिन’ येताना दिसणार असतील तर, वातावरण बदलते आहे, असाच अर्थ त्यातून काढता यावा. विशेष म्हणजे, इगतपुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते कै. गोपाळराव गुळवे यांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली. त्यांचे पुत्र संदीप यांनी गेल्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. आता वर्ष उलटत नाही तोच ते शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करते झाले आहेत. पण आश्चर्याची बाब यापुढे आहे व ती म्हणजे ज्यांच्यामुळे आपण डावलले जात असल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी काँग्रेस सोडली होती व या दोघांतील वितुष्ट उघडपणे दिसून येत होते, त्याच आमदार निर्मला गावित यांनी त्यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे आवतण दिले आहे म्हणे. थोडक्यात, कुणालाच कुणी वर्ज्य नाही. तसेही पक्षनिष्ठा वगैरे आता बासनात बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याची भिड कुणाला राहिलेली नाही. रोकडा संधीचा विचार सर्वांकडून केला जातो. आज काय मिळणार आहे, हे बघून पक्षांतरे होत आहेत. पक्षात येऊन पक्ष कार्य करून नंतर काही मिळविण्यासाठी थांबायला कुणी तयार नाही. त्यामुळे आज एकीकडे काही न मिळाल्यास उद्या हेच आयाराम पुन्हा दुसरीकडे उड्या मारताना दिसून येऊ शकतात. पण ही पक्षांतरे होत असताना बहुधा एखाद्या लाटेमुळे जसे घडून येते तसे कुणा एका पक्षाकडे हा जाणाºयांचा ओढा नसून सर्वच पक्षांत आयाराम-गयारामांचे सत्र सुरू असलेले दिसून येत आहे. आजच्या प्राथमिक अवस्थेत सर्वांना समान संधी दिसत असल्याचे म्हणता यावे, ते त्यामुळेच.