शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शिवाजी उद्यानाचे बदलणार रूपडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:20 IST

शहराच्या विविध भागांत चारशेहून अधिक उद्याने साकारण्यात आली, परंतु नगरपालिका काळापासून असलेले जुन्या शिवाजी उद्यानाला मात्र अवकळा आली. सीबीएससारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या उद्यानाची अवकळा आता थांबणार असून, सुमारे चार कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहासभेत प्रस्ताव : चार कोटी रुपयांचा खर्च

नाशिक : शहराच्या विविध भागांत चारशेहून अधिक उद्याने साकारण्यात आली, परंतु नगरपालिका काळापासून असलेले जुन्या शिवाजी उद्यानाला मात्र अवकळा आली. सीबीएससारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या उद्यानाची अवकळा आता थांबणार असून, सुमारे चार कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येणार आहे.महापालिकेची महासभा येत्या दि. १९ डिसेंबर रोजी होणार असून, त्यात हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी मांडण्यात आला आहे. याशिवाय शहरात चुंचाळे, सिडकोतील पाटीलनगर येथील जुन्या मलजल केंद्रासह अनेक ठिकाणी क्रीडांगणे विकसित करण्याचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत.शहरातील मध्यवर्ती आणि नगरपालिका काळापासून असलेल्या शिवाजी उद्यानाचे नामकरण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हस्ते झाले आहे. मध्यवर्ती ठिकाणी तीन ते साडेतीन एकर जागेत असून, या उद्यानाकडे महपालिकेने लक्ष पुरवले नाही. मध्यंतरी मनसेच्या काळात खासगीकरणातून उद्यान विकसित करण्यासाठी काही उद्योगांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, परंतु उपयोग झाला नाही. वनखात्याच्या अखत्यारितील वनौषधी उद्यानाचा विकास महापालिकेने केला, परंतु शिवाजी उद्यानाकडे दुर्लक्ष झाले होते. आताही स्मार्ट सिटी योजनेत नेहरू उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले, तर अमृत योजनेअंतर्गत तवली फाटा आणि दसक येथील उद्यान विकसित करण्यात आले. परंतु शिवाजी उद्यानाकडे लक्ष पुरवले नव्हते. मात्र आता नाशिक महापालिकेने अमृत योजनेच्या दुसºया टप्प्यात याच उद्यानाच्या नूतनीकरणाचा निर्णय झाला असून, ४ कोटी ६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय याच महासभेत अन्य अनेक उद्याने आणि क्रीडांगणांचे प्रस्ताव आहेत. पेलिकनच्या जागी सेंट्रल गार्डन तयार करण्याची तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची योजना होती. त्यानुसार ३२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे.मगर यांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्तावच्नाशिक महापालिकेच्या संगणक विभागाचे अभियंता प्रशांत मगर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला असून, तो प्रशासनाने मंजुरीसाठी महासभेवर ठेवला आहे. अर्थात, सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू असून प्रशासनाकडे अधिकाºयांची कमतरता असल्याने मगर यांना स्वेच्छानिवृत्त करण्यास परवानगी देऊ नये, असे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.मनपा बॉक्स क्रिकेट साकारणारच्महापालिकेच्या वतीने गोविंदनगर येथील चौक नंबर चारमधील मोकळ्या जागेवर बॉक्स क्रिकेटचे क्रीडांगण विकसित करण्याचा प्रस्ताव प्रथमच सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक