प्रसाद जोशी/वसंत तिवडेत्र्यंबकेश्वर - नाशिक त्र्यंबक रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यासाठी एन एम आर डी ए तर्फे बळजबरीने जमीन अधिग्रहण सुरू आहे. हा रस्ता इतका मोठा करण्याची गरज नसतानाही जमीन अधिग्रहण केले जात आहे. जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री असले तरी एकही मंत्री या पिडितांचे अश्रू पोहोचण्यासाठी आला नाही, अशी खंत इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत आमदार खोसकर बोलत होते. आपण कायम मतदारसंघातील नागरिकांच्या पाठीशी उभे असल्याचा दिलासाही त्यांनी दिला. याप्रसंगी बोलताना श्री पंचायती आनंद आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरानंद सरस्वती यांनी सरकार कुंभमेळ्याच्या नावाखाली मनमानी करीत असल्याचा आरोप केला. साधू महंत आणि पुरोहित संघाला विश्वासात घेतले जात नसल्याचेही शंकरानंद सरस्वती म्हणाले.
Web Summary : MLA Hiraman Khoskar criticizes lack of ministerial support for land acquisition victims in Nashik. He alleges forced land acquisition for the Nashik-Trimbak road. Shankar Anand Saraswati accuses government of ignoring priests regarding Kumbh Mela preparations, alleging arbitrary actions without consulting stakeholders.
Web Summary : विधायक हिरामन खोसकर ने नासिक में भूमि अधिग्रहण पीड़ितों के लिए मंत्री समर्थन की कमी की आलोचना की। उन्होंने नासिक-त्र्यंबक सड़क के लिए जबरन भूमि अधिग्रहण का आरोप लगाया। शंकर आनंद सरस्वती ने कुंभ मेला की तैयारियों के संबंध में पुजारियों को अनदेखा करने का आरोप लगाया।