शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धिक क्षमता असतानाही भारतीय पेटंटचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:12 IST

भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रसाद कोकीळ : अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेत व्यक्त केली खंत

नाशिक : भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली. पेटंटच्या माध्यमातून भारत देश जगभरातील बौद्धिक संपत्तीवर अधिकार प्राप्त करून राष्ट्रीय संपत्ती निर्माण करू शकेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेतर्फे सावानाच्या औरगांबाद सभागृहात मंगळवारी (दि.१५) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना त्यांनी ‘देशाच्या विकासात तरुणांचे योगदान’ विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रवि शास्त्री, संदीप भानुसे आदी उपस्थित होते. संपत्ती निर्माण करताना आपण मुळात राष्टÑ संपत्तीचा विचारच करीत नाही. आपल्या भोवतालच्या समाजाचा विकास लक्षातच घेतला जात नाही; मात्र राष्ट्रसंपत्ती व संपन्नता हाच खरा विकास असतो. आजच्या तरुण पिढीने याच मार्गाने राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा कुलकर्णी व पंकज कुं वर यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्योती कोल्हे यांनी आभार मानले.आपली ऊर्जा राष्ट्रहितासाठी खर्च व्हावीतरुण पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी माणसांच्या आरोग्याचा विचार करणारा, निसर्गाचा समतोल राखणारा, आपली धर्म संस्कृती जपत कलेचा आनंद घेणारा व आपल्या विकासाबरोबरच राष्ट्रहिताचा विचार करणारा माणूस आपण निर्माण करू शकलो तरच देश विकासाच्या दिशेने जाईल. मुळात आपली ऊर्जा ही राष्ट्राच्या हितासाठी व मनुष्याच्या विकासाठी खर्च व्हायला हवी, असे मत कोकीळ यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक