शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

युती झाली तरी दानवे विरूद्ध लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:57 IST

भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज व घमेंड आली आहे, ही घमेंड उतरविण्यासाठीच आपण लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर : जालन्यात उभे राहण्याची घोषणा

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज चढला असून, त्यांची नेते व पदाधिकाऱ्यांची वागणूक क्लेषदायक असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा माज उतरविण्यासाठी आपण जालना लोकसभा मतदार संघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचा पुनरूच्चार शिवसेनेचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला. भाजपा-सेनेची युती झाली तरी, पक्ष प्रमुखांकडून अनुमती घेवून लढणारच असा दावाही त्यांनी केला.

नाशिक येथे भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी अर्जुन खोतकर मंगळवारी नाशिक दौ-यावर आले असता प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढविण्याचा पुनरूच्चार करताना, कोणत्याही परिस्थितीत आपणच विजयी होणार असा दावाही त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज व घमेंड आली आहे, ही घमेंड उतरविण्यासाठीच आपण लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना भाजपाच्या युतीबाबत चर्चा होत असली व भाजपाने कितीही युतीसाठी पुढाकार घेतला तरी, सेनेचा अंतीम निर्णय पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे हेच घेतील. परंतु युती झाली तरी, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढत देण्यासाठी पक्षाची अनुमती घेवून रिंगणात उतरणारच असल्याचेही खोतकर यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा