नाशिक : न्यू इरा शाळेत विद्यार्थ्यांसाठी जर्नालिस्ट, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह, आन्त्रप्रेनर, म्युझिक, फाइन आर्ट, प्रोजेक्ट असे विविध क्लब स्थापन करण्यात आले. यातील जर्नालिस्ट क्लबमध्ये व्यंगचित्रकार ज्ञानेश बेलेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रोजेक्ट क्लबमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्प व त्यांची माहिती सादर केले. म्युझिक क्लबमध्ये प्रसिद्ध तबलावादक सुधीर करंजीकर यांनी तबलावादनाची माहिती दिली. फाइन आर्ट क्लबमध्ये शुभांगी बैरागी यांनी मिरर वर्कचे प्रात्यक्षिक सादर केले. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह क्लबमध्ये प्रश्नमंजूषा घेण्यात आली.
न्यू इरा शाळेत क्लब स्थापना
By admin | Updated: October 14, 2014 01:23 IST