शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

इस्कॉन मंदिरात कोजागरी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 01:25 IST

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने श्रीश्री राधा-मदनगोपाल मंदिरात कोजागरी तथा शरद पौर्णिमा जल्लोषात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देशरद पौर्णिमा महोत्सव : राधा-कृष्णाची सुंदर सजावट

नाशिक : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने श्रीश्री राधा-मदनगोपाल मंदिरात कोजागरी तथा शरद पौर्णिमा जल्लोषात साजरी करण्यात आली.शरद पौर्णिमेनिमित्त मंदिराला तसेच श्री राधा-कृष्णाची सुंदर सजावट करण्यात आली होती. वेदीवर वृंदावनाचा नयनरम्य देखावा प्रस्तुत करण्यात आला होता. महोत्सवाला सकाळी ९ वाजेच्या मंगल आरतीपासूनच सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन, आरती, श्रीमद्भागवत प्रवचन झाले. संध्याकाळी झालेल्या प्रवचनात श्रीमान शिक्षाष्टकम प्रभू म्हणाले की, भगवान श्रीकृष्णांनी हजारो गोपींसमवेत रासनृत्य केले होते. गोपींची उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे व साधकाने त्यांच्यापासून शरणागती शिकायला हवी. याच दिवसापासून कार्तिक मासदेखील प्रारंभ होतो व त्यालाच दामोदर मास असेदेखील म्हणतात. प्रवचनानंतर दामोदर अष्टकम म्हणण्यात आले व उपस्थित सर्व भाविकांनी श्री श्री राधा मदनगोपाल व दामोदर यांना तुपाचे दिवे अर्पण केले.दरम्यान, कार्तिकच्या संपूर्ण महिन्यात म्हणजेच १३ आॅक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत मंदिरात रोज सकाळी ८.१५ वाजता व संध्याकाळी ७.३० वाजता दामोदर अष्टकम व दीपदान कार्यक्रम होणार आहे. याचा नाशिककरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन दास यांनी केले आहे. शरद पौर्णिमा महोत्सवास गोपालानंद प्रभू, मुकुंदरस प्रभू, सार्वभौमकृष्ण प्रभू, जानकीनाथ प्रभू, अक्षय एडके, सुमेध पवार, भूपेंद्र, श्रीमती जेऊरकर माताजी, अंतरंगा शक्तीदेवी दासी, तुलसी सेविका माताजी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकkojagariकोजागिरीReligious programmeधार्मिक कार्यक्रम