शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 1:18 AM

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलल्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेचे राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, दोन महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतिपदाच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलल्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेचे राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, दोन महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतिपदाच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या यापूर्वी दोन जागा रिक्त असून, विधानसभा निवडणुकीनंतर आणखी दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे चार जागांच्या पोटनिवडणुकीनंतर समीकरणांमध्ये आणखी बदल अपेक्षित आहे.मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा परिषदेतूनच अनेक आमदार, खासदारांचा पुढील राजकीय मार्ग प्रशस्त झाला असून, आताच्या विधानसभा निवडणुकीतही अनेक सदस्यांनी निवडणुकीची तयारी केली. त्यात प्रामुख्याने नितीन पवार, हिरामण खोसकर, यतिन कदम, भास्कर गावित यांनी प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उडी घेतली असली तरी, निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनीषा पवार, अर्पणा खोसकर, यतिन पगार या पदाधिकाऱ्यांबरोबरच सीमंतिनी कोकाटे, जयश्री पवार, सयाजीराव गायकवाड, आत्माराम कुंभार्डे, संजय बनकर, महेंद्रकुमार काले, मंदाकिनी बनकर, किरण थोरे आदी सदस्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी उघड उघड प्रचार केला आहे, तर काहींनी थेट पक्ष भेद विसरून विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्याही प्रचारात भाग घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलली असून, जिल्हा परिषदेचे हिरामण खोसकर व नितीन पवार हे दोघे सदस्य विधानसभेची पायरी चढली आहेत. यतिन कदम, भास्कर गावित हे अपयशी ठरले आहेत.लोकसभा निवडणुकीतही राष्टÑवादीच्या सदस्य डॉ. भारती पवार सेनेचे सदस्य धनराज महाले यांनी पक्षांतर करून लोकसभा निवडणूक लढविली. त्यातील डॉ. पवार यशस्वी झाल्या तर महाले यांना घरी बसावे लागले. मात्र या दोघांनाही जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दोन्ही निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत.निवडणुकीत काहींनी पक्षाचे तर काहींनी विरोधात कामे केल्यामुळे त्याची दखल प्रत्येक पक्षाने घेतली आहे. मनीषा पवार यांनी पती रत्नाकर पवार यांच्यासाठी भाजपच्या विरोधात काम केले तर सीमंतिनी कोकाटे या भाजपच्या सदस्य असताना त्यांनी वडील माणिकराव कोकाटे यांच्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसचा उघड उघड प्रचार केला आहे. अर्पणा खोसकर या राष्टÑवादीच्या असल्या तरी, त्यांनी वडील हिरामण खोसकर यांच्यासाठी कॉँग्रेसचा प्रचार केला तर नयना गावित या कॉँग्रेसच्या असूनही त्यांनी आई निर्मला गावित यांच्यासाठी सेनेचा प्रचार केला आहे. त्यामुळे आगामी पदाधिकारी निवडीसाठी राजकीय समीकरणे जुळविताना सर्वच पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. ही बदललेली राजकीय समिकरणे आता जिल्हा परिषदेच्या राजकारणावर कोणते परिणाम घडवितात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.जिल्हा परिषदेच्या दोन जागा गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असून, त्यात आता नाशिक तालुक्यातील गोवर्धन गट व कळवण तालुक्यातील कनाशी गटाच्या जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे.आजवर लोकप्रतिनिधी झालेले सदस्यजिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले अनिल कदम, नरहरी झिरवाळ, धनराज महाले, शिरीष कोतवाल, माणिकराव कोकाटे, हरिश्चंद्र चव्हाण, डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे, शिवराम झोले, काशीनाथ मेंगाळ आदींनी अगोदर जिल्हा परिषदेची पायरी चढली व नंतरच त्यांना विधिमंडळ, संसदेत पोेहोचणे शक्य झाले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदPoliticsराजकारण