शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीच्या तळ कॉँक्रीकीटणामुळेच पर्यावरणीय समस्या: उत्तमराव निर्मळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:05 IST

नाशिक : गोदावरी नदीभोवती कॉँक्रिटीकरणाचा फास आवळला गेला आहे. त्यातच तळ कॉँक्रीटीकरण देखील करण्यात आल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र मोकळे झाले पाहिजे, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपाणी साचल्याने कुजतेसिंमेटचे घाट ठिक, मात्र पात्र मोकळे ठेवणे गरजेचे

नाशिक :गोदावरी नदीभोवती कॉँक्रिटीकरणाचा फास आवळला गेला आहे. त्यातच तळ कॉँक्रीटीकरण देखील करण्यात आल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र मोकळे झाले पाहिजे, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केले. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने गोदापात्रातील तळ कॉँक्रीटीकरण काढण्यात येणार आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत असतानाच त्यास आक्षेप घेतल्याने काम थांबविण्यात आले असून त्यावर मतभिन्नता आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्मळ यांच्याशी साधलेला हा संवाद..

प्रश्न- नदीचा विशीष्ट भागात तळ कॉँक्रीटचा असला पाहिजे किंवा नको असे दुमत सध्या नाशिकमध्ये जाणवत आहे. त्याबद्दल तुमचे मत काय?निर्मळ- नदी ही नैसर्गिकरीत्या प्रवाही असली पाहिजे. त्यामुळे पाणी प्रवाही राहाते आणि पाण्यातील तर त्यातील जैविक साखळी कायम राखली जाते. नदीपात्र मोकळे असेल तर सूर्यकिरणे तळापर्यंत पोहचतात आणि बॅक्टेरीया पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करतात. परंतु नदीचे तळ कॉँक्रिटीकरण केल्यास त्यातील बॅक्टेरीया राहत नाही. पाण्याला साचलेपणा येतो. आणि त्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात.

प्रश्न- कॉँक्रिटीकरणामुळे नक्की काय अडचणी येतात?निर्मळ- कॉँक्रिटीकरण केल्यामुळे नदीपात्रात पाणी साचले की ते कुजते आणि त्याला दर्प येतो. नाशिकमध्ये राहून अनेक नागरिक रामकुंडाचे पाणी पिण्यास धजावत नाही. पाणी साठल्यानंतर ते शुद्धीकरणाची प्रक्रिया होत नसल्याने कुजते आणि त्यामुळेदेखील दर्प येतो.

प्रश्न- गोदावरी नदीच्या कॉँक्रीटीकरणाबाबत मत काय?निर्मळ- नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रात तळ कॉँक्रिटीकरण करण्यात आले आणि घाटदेखील बांधण्यात आले आहे. यामुळे नदीपात्राची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीची अवस्था बिकट झाली असून, गोदावरी कॉँक्रिटीकरणातून मुक्त करण्याची गरज आहे. मी नाशिकमध्ये जलसंपदा विभागात कार्यरत असताना देखील तळ कॉँक्रिटीकरण काढावे असे मी सूचवले होते.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीgodavariगोदावरी