शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर येथे प्रस्तावित समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:03 IST

शेतकर्‍यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्‍याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले.

सिन्नर : शेतकर्‍यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्‍याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले. प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी येथील भगवती लॉन्स येथे पार पडली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे आर. व्ही. पाटील, रस्ते विकास महामंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोके, जिल्हा भूमिअभिलेख विभागाचे अधीक्षक अनिल माने, भूसंपादन अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी आदी उपस्थित होते.  यापूर्वी राबविण्यात आलेल्या प्रकल्पांतील अनुभव पाहता पर्यावरण सुनावणी केवळ प्रशासकीय प्रक्रिया असल्याचा आक्षेप शेतकर्‍यानी घेतला. विविध प्रकल्पांत लाखो झाडांची कत्तल यापूर्वीही झाली आहे.मात्र एकाच खड्ड्यात अनेकदा झाडे लावली. यापूर्वी कधीही आश्वासने पाळली गेली नाही. सध्याच्या सुनावणीनंतर ती पाळली जाणार नसल्याचे भाकीत शेतकºयांनी केले. त्यामुळे प्रशासनाइतका वेळ वाया घालवू नये, असा सल्लाही शेतकर्‍यानी दिला. काम सुरू असताना पाण्याचे प्रदूषण काही काळापुरते होऊ शकेल. आजूबाजूला धूळ उडणार असली तरी ती घालविण्यासाठी जागोजागी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोके यांनी सांगितले.  ध्वनी प्रदूषण  थांबविण्या-साठी मुंबई आयआयटीने बनविलेले नॉइस बॅरिअर जिल्ह्यात ६ किलोमीटर बसविण्यात येणार आहेत. जेवढी वनजमीन जाणार आहे तेवढीच उपलब्ध करून तितक्याच झाडांची लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिन्नर तालुक्यातील समृद्धबाधित गावांच्या पर्यावरण जनसुनावणीसाठी केवळ सुमारे १०० शेतकºयांची उपस्थिती लाभली.द्राक्ष, टमाटे नष्ट होण्याची भीतीप्रकल्प झाल्यावर झाडे लावली जात नाहीत, महामार्गाच्या भरावासाठी टेकड्या नष्ट केल्या जातील याची हानी कशी भरून काढणार, असा आक्षेप विष्णू हारक या शेतकर्‍याने घेतला. सिन्नर-घोटी महामार्गाच्या प्रदूषणाने भात पीक नष्ट झाले असून, आता समृद्धीमुळे द्राक्ष, टमाटे पिके नष्ट होतील याची भीती व्यक्त केली. सोमनाथ वाघ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पाण्याचे नष्ट होणारे स्रोत परत कसे मिळविले जाणार, असा सवाल उपस्थित केला.

टॅग्स :Farmerशेतकरीenvironmentवातावरण