शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

पर्यावरण संवर्धक

By admin | Updated: June 5, 2017 00:56 IST

निसर्गावर मानवाचे होणारे आक्रमण हा विषय अधिक गंभीर बनला आहे.

 निसर्गावर मानवाचे होणारे आक्रमण हा विषय अधिक गंभीर बनला असून, त्यामुळेच पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पर्यावरण दिन आला की निसर्गाची महती सांगणारे अनेक उपक्रम राबवले जातात आणि शासकीय-निमशासकीय खातेही त्यात अग्रेसर असतात. परंतु निसर्गप्रेम केवळ आठवड्यातून, वर्षातून एकदा दिवस जागृत करण्याचा विषय नाही तर सातत्याने निसर्गसंवर्धन झाले. शहरात आणि जिल्ह्यात अनेक संस्था वर्षभर पर्यावरणासाठी काम करतात. मग कोणी झाडांना आठवड्याला पाणी घालते तर कोणी कॅरिबॅगमुक्तीसाठी झगडते. एखादी संस्था वेळ नसलेल्या नागरिकांना झाडे लावून देण्याचे काम करते तर काही संस्था कचरा व्यवस्थापनाचे धडे देतात. नदी, पशुपक्षी आणि अन्य अनेक स्वरूपात काम करणारे सारेच आपल्या अवतीभोवती काम करणारे पर्यावरण कार्यकर्ते... जागतिक पर्यावरण दिनाच्यानिमित्ताने यंदाचे घोषवाक्य आहे. ‘माणसाला निसर्गाशी जोडा’ अगदी त्याच वृत्तीने आपले दैनंदिन काम सांभाळून समाजाबरोबरच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या निवडक पर्यावरणप्रेमी संस्था प्रेरणादायी ठरू शकतात. नाशिक : वृक्ष, पशु, पक्ष्यांपुरतेच पर्यावरण मर्यादित नसून मानव कशी जीवनशैली जगतो हा देखील पर्यावरणाचा भाग आहे. पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी सखोल माहिती सर्वसामान्य नागरिक आणि पर्यावरणप्रेमींना देण्यासाठी नाशिकरोडच्या ‘कार्व्ही रिसोर्स लायब्ररी’ महत्त्वाची ठरली आहे. आत्तापर्यंत पावणे चारशे पर्यावरण प्रेमी या लायब्ररीचे सदस्य असून, वाचनाच्या माध्यमातून ही पर्यावरण चळवळ वाढविण्यासाठी अधिकाधिक जिज्ञासुंना आकर्षित केले जात आहे. पर्यावरणाशी संबंधित इंटरनेटवर इंग्रजी साहित्य उपलब्ध असताना अनेकदा विद्यार्थी शाळा - महाविद्यालयांचे प्रोजेक्ट सादर करतात आणि सर्रासपणे इंटरनेटवरील माहितीचा वापर करतात हे चित्र बदलावे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाची ओळख व्हावी, त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांना पर्यावरणाचे शास्त्रीय ज्ञान मिळावे यासाठी नाशिकरोड येथील दत्तमंदिर परिसरात कार्व्ही रिसोर्स लायब्ररीची नऊ वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली.कार्व्ही वाचनायलय निसर्ग या संकल्पनेवर आधारित असून या वाचनालयात अनेक कथा, विविध मोहिमा, वैज्ञानिक संदर्भ असून विद्यार्थ्यांसह पालकांना ही लायब्ररी उपयुक्त ठरत आहे. आयुष्यातील भौतिक सुखापेक्षाही मानवी मनासाठी आवश्यक असणारी मानसिकता सहजपणे वाचनालयातील ग्रंथसंपदेमुळे पूर्ण होत असल्याची भावना वाचनालयाचे अजित बर्जे यांनी व्यक्त केली. ग्रंथवाचनाबरोबरच वाचनालयातील प्रत्येक सभासदांसाठी निसर्ग आणि पर्यावरणविषयक माहितीपट आणि चित्रपटांचे स्क्रिनिंग दाखवले जाते तसेच भविष्यात युवा पिढीला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रम वाचनालयाद्वारे राबविले जाणार आहेत. वाचनालयाच्या संदर्भग्रंथ विभागात प्रत्येक पुस्तकांवर निसर्गाचे विविध पैलू उलगडणारे मुखपृष्ठ लावण्यात आले असून, यात पक्षी, समुद्री जीवन, खडक आणि खनिजे, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, विविध फुले, शेती, अंतराळ आदिंचा समावेश आहे. यापुस्तकांमुळे वाचकांना विषय लवकर समजण्यास मदत होते आणि वाचकांना आनंद आणि सखोल वाचनास मदत होते. वाचनालयात सर्व वयोगटातील वाचकांसाठी इंग्रजी आणि मराठी भाषेतील निसर्ग तसेच पर्यावरणाशी संबंधित साहित्य पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.