शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चित्र प्रदर्शनातून पर्यावरण जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 15:55 IST

पेगलवाडी : सिद्धार्थ धारणे यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

ठळक मुद्दे पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने मनापासुन प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली असल्याचे लोहगावकर यांनी सांगितले

त्र्यंबकेश्वर : पृथ्वीचे वाढते तापमान हा जगभर चिंतेचा विषय आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करीत आहे. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे . चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातुन हा संदेश सर्वदूर पोहोचेल आणि नागरीकांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण होईल, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी केले.पेगलवाडी (त्र्यंबक) येथे आयोजित करण्यात आलेल्या सिद्धार्थ धारणे यांच्या पर्यावरण जनजागृती विषयक चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. देशाला सुंदर अशी निसर्ग संपदा लाभलेली आहे. जगभरातील सर्व प्रकारचे हवामान भारतात बघावयास मिळते. स्वत:ला बुध्दीमान समजणाऱ्या मानवाच्या अति हव्यासा पोटी संपुर्ण मानवजातच विनाशाच्या उंबरवठ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अशा या सुंदर निसर्ग संपदेचे संरक्षण करणे, जतन करणे फार आवश्यक असुन त्यासाठी आपण सर्वांनी सामुहिक प्रयत्न करावेत. या प्रदर्शनातून चित्रकार सिध्दार्थ धारणे यांनी पर्यावरण विषयक संदेश दिला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने मनापासुन प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली असल्याचेही लोहगावकर यांनी सांगितले. यावेळी स्वामी विजय महाराज मुमुक्षु, पोलीस उपनिरिक्षक कैलास आकुले , शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख भुषण अडसरे, शहर प्रमुख सचिन दीक्षित, छोटु पवार, भावेश शिखरे, हर्षल शिखरे, संकेत टोके, शेखर सावंत, संघाचे राजेंद्र ढेरगे, वैभव देशपांडे, आदि नागरीक उपस्थित होते.पन्नासहून अधिक चित्रेभारतामधील विविध प्रांतातील निसर्ग निर्मित तब्बल चाळीस सौंदर्यस्थळे तसेच इतर अप्रतिम कॅनव्हास पेंटीग्ज अशा ५० पेक्षा अधिक पेटींग्ज प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संतोष कदम, युनिकॉल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हेमल चुघ, पेगलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सदस्य पांडुरंग आचारी, आर्ट गॅलरीचे संचालक रविंद्र धारणे, ज्योती धारणे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरण