नाशिक : कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला जात असतो. नाशिक शहरात मात्र पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा केला असून, गोदावरी प्रदूषणमुक्तीपासून प्लॅस्टिकबंदीचे मुद्दे मांडताना जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा समावेश करेल त्याच पक्षाला मतदान करा, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे या कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.यासंदर्भात सर्व कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक पंचवटीत गोदावरी किनारी संपन्न झाली. गोदावरी नदी व या नदीस मिळणाऱ्या उपनद्या या गटारमुक्त प्रदूषणमुक्त व कॉँक्रीटीकरण मुक्त कराव्यात, भूजल पातळी सुधारण्यासाठी विहिरी व जलस्रोत यांचे पुनर्भरण कण्यात यावे, विंधनविहिरी खोलीकरणाची मर्यादा वाढविली पाहिजे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची प्रभावी अंमलबजावणी करावी, नवीन वसाहती व ग्रामीण भागात सेप्टिंक टॅँक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, वृक्षारोपण केल्यानंतर त्याचे संवर्धन करून आॅक्सिजन बॅँक तयार करावी, दरवर्षी वृक्षलागवडीचे आॅडिट करावे, डोंगर, पहाड खोदून गौण खनिजाचा उपसा बंद करावा, डोंगरांवरील अतिक्रमण थांबवून वणवामुक्त अभियान राबवावे, गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे, सार्वजनिक वाहतुकीसाठी सीएनजीचा वापर झाला पाहिजे, वायू गुणवत्ता निर्देशांक ५० इतका असावा, पाला पाचोळ्यापासून कागद, खत या वस्तू तयार कराव्यात, प्राणी क्रूरता कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी, प्राण्यांसाठी रुग्णवाहिका असावी, प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशाप्रकारचा हा जाहीरनामा आहे.यासंदर्भात उपस्थित सर्वांनीच पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यात जसबीर सिंग, प्रा. सोमनाथ मुठाळ, कचरू वैद्य, अॅड. अमोल घुगे, योगेश घुगे, अमित कुलकर्णी, नितीन कोळेकर, निशिकांत पगारे, सविता सिंह, योगेश बर्वे यांच्यासह विविध पर्यावरण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणुकीत पर्यावरण कार्यकर्त्यांचाही जाहीरनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:58 IST
कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला जात असतो. नाशिक शहरात मात्र पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा केला असून, गोदावरी प्रदूषणमुक्तीपासून प्लॅस्टिकबंदीचे मुद्दे मांडताना जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा समावेश करेल त्याच पक्षाला मतदान करा, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे या कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.
निवडणुकीत पर्यावरण कार्यकर्त्यांचाही जाहीरनामा
ठळक मुद्देगोदावरी प्रदूषणमुक्तीचा आग्रह