सरस्वती विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 07:07 PM2019-01-22T19:07:13+5:302019-01-22T19:07:41+5:30

येवला : सायगाव ता. येवला येथील सरस्वती विद्यालयात संस्थेचा ३६ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्र म उत्साहात संपन्न झाला.

Enthusiasm of Saraswati Vidyalaya | सरस्वती विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात

सायगाव येथील सरस्वती विद्यालयाचा वर्धापनिदन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करतांना माजी आमदार मारोतराव पवार समवेत राष्ट्रवादी पार्टीचे नेते माणकिराव शिंदे, संस्था अध्यक्ष विष्णुपंत कुळधर, जिप सदस्य महेंद्र काले, संजय बनकर.

googlenewsNext
ठळक मुद्दे याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले.

येवला : सायगाव ता. येवला येथील सरस्वती विद्यालयात संस्थेचा ३६ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्र म उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविकात मुख्याध्यापक सी. बी. कुळधर यांनी शाळेचा विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आलेख मांडून संपूर्ण विद्यालय डिजिटल करण्यासाठी किटबद्ध असल्याचे सांगून ग्रामस्थ व तालुक्यातील मान्यवरांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. माणिक शिंदे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, संजय बनकर, पंचायत समिती उपसभापती रु पचंद भागवत, राज्य पणन संघाचे सल्लागार भागूनाथ उशीर, सरपंच योगिता भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्ष विष्णुपंत कुळधर यांनी मान्यवरांचा सत्कार केला. दिंडी निघणार आहे या काव्यसंग्रहास राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी भालेराव यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले. विविध स्पर्धांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सुरेश देवरे आणि बाळू पैठणकर यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले.
यावेळी उपसरपंच दिनेश खैरनार, संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव उशीर, रघुनाथ खैरनार, भाऊसाहेब आहिरे, सुनील देशमुख, संजय देशमुख, गणपत खैरनार, अशोक कुळधर, बशीर्र शेख, गणपत उशीर, ज्ञानेश्वर भालेराव, विजय खैरनार, दिनकर लोहकरे, वसंत खैरनार, संजय मिस्तरी, प्रविण खैरनार, ज्ञानेश्वर भागवत, ज्ञानेश्वर जगझाप, लहानू कुळधर, विलास भालेराव, बबन ढाकणे, रावसाहेब कांबळे, सुदाम भालेराव, सोपान भालेराव, दिलीप दारु ंटे, बंडू निघुट, भिवसेन डोईफोडे उपस्थित होते.
कार्यक्र मासाठी मुख्याध्यापक बाळकृष्ण गायकवाड, सुरेश देवरे, बाळू पैठणकर, गोरख धनवटे, अशोक शेलार, जगन्नाथ रोहम, अरु ण केकाणे, बाळू राजोळे, मीना कुळधर, आशालता खैरनार, सुनंदा भस्मे, सोनाली आहेर यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Enthusiasm of Saraswati Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा