सिन्नर : गुरुच्या अस्तामुळे आधी महिना-सव्वा महिना तसेच संपूर्ण मार्च व एप्रिलचे दोन आठवडे असा खंड गेल्यानंतर २० एप्रिलपासून लग्नसराईची धूम सुरू झाली. ती १२ मे पर्यंत असल्याने लग्नसराईचा धूमधडाका सुरू झाला. एकाच दिवशी अनेक लग्न समारंभ असल्याने वºहाडी मंडळींची लग्नांना हजेरी लावण्यासाठी तारांबळ दिसून येत आहे. तपमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहोचला असतानाही नाईलाजाने नातेवाइकांच्या लग्नसोहळ्याला इष्टमंडळींसह हजेरी लावणे गरजेचे असल्याने उन्हाचे चटके सहन करत वºहाडी मंडळी हजेरी लावताना दिसत आहे. लग्नासाठी केवळ १२ मेपर्यंत मुहूर्त असल्याचे ब्रह्मवृदांकडून सांगण्यात आले आहे; मात्र त्यानंतर पुन्हा जून, जुलैमध्ये लग्नतिथी आहेत. पावसाळ्यात शेत मशागतीच्या कामांमुळे तसेच खरीप हंगामामुळे शेतीकडे लक्ष देणे शेतकरी पसंत करतात. हंगामाच्या काळात लग्न करण्याऐवजी त्याआधीच बार उडविण्यावर ग्रामीण भागातील कुटुंबाचा भर असतो. २० एप्रिल ते १५ मे हा काळ लग्नतिथी उरकून घेण्यात शेतकरी व बहुतेक समाज धन्यता मानतात. मंगल कार्यालय, केटरिंग, आचारी, घोडेवाले, लग्न साहित्यांच्या मागणीत वाढ झाल्याने यांचे दाम वाढल्याचे चित्र दिसत आहे. १५ मे नंतर अधिकमासाला प्रारंभ होणार असल्याने दोन दिवसात लग्नतिथी उरकावी लागत आहे. तपमानाचा पारा वाढला तरी लग्नसोहळा पार पाडण्यासाठी धांदल उडत आहे.
उकाड्यातही उत्साह : चटके सहन करत हजेरी; शनिवारी शेवटचा विवाह मोजक्या तिथींमुळे तळपत्या उन्हात लग्नांचे बार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:19 IST
सिन्नर : गुरुच्या अस्तामुळे आधी महिना-सव्वा महिना तसेच संपूर्ण मार्च व एप्रिलचे दोन आठवडे असा खंड गेल्यानंतर २० एप्रिलपासून लग्नसराईची धूम सुरू झाली.
उकाड्यातही उत्साह : चटके सहन करत हजेरी; शनिवारी शेवटचा विवाह मोजक्या तिथींमुळे तळपत्या उन्हात लग्नांचे बार!
ठळक मुद्देलग्नसराईचा धूमधडाका सुरू झालानाईलाजाने नातेवाइकांच्या लग्नसोहळ्याला इष्टमंडळींसह हजेरी लावणे गरजेचे