नाशिक : अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडत असताना श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रामभूमी नाशकातही भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अनेक घरांवर भगवे ध्वज फडकत असून अंगणामध्ये रांगोळ्या रेखाटल्या गेल्या आहेत. राम मंदिरांमधून ‘जय श्रीराम’चे घोष ऐकू येत असून घंटानाद व शंखध्वनी सुरू आहेत, अवघे जन रामरंगी रंगले आहे. तपोवन, पंचवटी, रामकुंड, काळाराम मंदीर परिसरात भक्तीमय वातावरण पहावयास मिळत आहे.
रामभूमी नाशकात भक्तांचा उत्साह शिगेला; घराघरांवर फडकले भगवे ध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:55 IST
भगवान श्रीराम यांनी आपला वनवास काळ नाशिकच्या पंचवटी दंडकारण्यात व्यतित केल्याचे दाखले इतिहासात व पुराणात आढळतात.
रामभूमी नाशकात भक्तांचा उत्साह शिगेला; घराघरांवर फडकले भगवे ध्वज
ठळक मुद्दे शौनकाश्रम येथे २१फुटी गुढी उभारण्यात आली ‘उंच उभारू माणुसकीची गुढी राम असलेली घडेल पुन्हा एक पिढी’