नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील धरणावर फिरण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २९ रोजी) दुपारच्या सुमारास घडली. ऐन सणासुदीत अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. बुडून मृत पावलेल्या दोघांची नावे कमलसिंग खरकसिंग बिल्ट (२५), मनोजकुमार मोहनचंद्र जोशी (५१, दोघेही रा. उत्तराखंड, ह. मु. जिंदाल कंपनी मुंढेगाव) अशी आहेत. या घटनेत वाचलेल्या युवकाचे नाव रवींद्र भरत सिंग आहे. तिघेही युवक मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगार असल्याचे समजते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन्हीही युवक पाण्यात बुडाले. मृतदेह काढण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली. एक तासाने दुसरा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच गोंदे दुमाला येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे निवृत्ती गुंड यांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्यात साहाय्य केले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास फड तपास करत आहेत.मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोशया घटनेत बचावलेल्या रवींद्र सिंग याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, धरणावर गेलेल्या या तीन युवकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. ऐन धूलिवंदन सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मुकणे धरणात बुडून दोघांचा अंत; एकाला वाचवण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:33 IST
इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील धरणावर फिरण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २९ रोजी) दुपारच्या सुमारास घडली. ऐन सणासुदीत अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुकणे धरणात बुडून दोघांचा अंत; एकाला वाचवण्यात यश
ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील घटना; परिसरात हळहळ