शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

देवदर्शनाला जाताना बाप-लेकीचा अंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 18:38 IST

ताहाराबाद : अंतापूर येथील श्री दावल मलिक बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या ताहाराबाद येथील बाप-लेकीवर काळाने घाला घातल्याने त्यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. सदर घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी सात वाजेच्या सुमारास वाकी नाल्याच्या वळणावर घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे पत्नी गंभीर जखमी : वाकी नाल्याजवळील दुर्घटना

ताहाराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल अंबादास महाजन (३५) हे पत्नी नीलम (३०) व कन्या आर्या उर्फ किट्टू या सात वर्षाच्या चिमुकलीसह दुचाकीने अंतापूर येथील श्री दावल मलिक बाबांच्या दर्शनासाठी जात होते. श्रावण महिन्यातील दर गुरुवारी बाबांच्या दर्शनासाठी नित्यनेमाने जाणारे महाजन आज गुरुवारचे औचित्य साधून दर्शनासाठी निघाले होते. त्याच सुमारास अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका रुग्ण घेऊन सटाण्याकडे भरधाव वेगाने जात होती. वाकी नाल्याच्या वळणावर वाहनचालकाकडून रुग्णवाहिका नियंत्रित न झाल्याने त्यांनी महाजन यांच्या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर इतरत्र फेकले गेले. या अपघातात राहुल महाजन व त्यांची कन्या आर्या यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच अंत झाला, तर पत्नी नीलम या गंभीर जखमी झाल्या आहेत. दावल मलिक बाबांसाठी नेत असलेल्या प्रसादातील मेथीची भाजी, भाकर आणि गुळ रस्त्यावर पसरला होता. याप्रकरणी अधिक तपास जायखेडा पोलीस करीत आहेत.गुरुवारीच घडली दुसरी घटनाअंतापूर येथील श्री दावल मलिक बाबा यांचा दर गुरुवारी उत्सव असतो. यानिमित्त विविध भागातील हजारो भाविक या उत्सवाला हजेरी लावत असतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यापूर्वी गुरुवारच्याच दिवशी वाकी नाला परिसरात सकाळी फिरायला गेलेल्या भाऊसाहेब बापूराव मानकर यांना वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाजन कुटुंबातील बाप-लेकीचा अपघाती मृत्यू झाला तोही गुरुवारच्याच दिवशी. या दुर्दैवी योगायोगाची भाविकांनी आठवण करुन दिली.नाला बनला अपघाती क्षेत्रवाकी नाल्यावर जीवघेणे वळण असून याच भागात शाळा, गॅसचे गोडावूनही आहे. तसेच शेतकऱ्यांचीही लगबग मोठ्या प्रमाणात सुरु असते. वाहनांच्या वर्दळीमुळे याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत असल्याने हा नाला परिसराची अपघाती क्षेत्र म्हणूनही नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे. रस्त्याची अवस्थाही बिकट असल्याने संबंधित विभागाने नाल्याची उंची कमी करावी अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Accidentअपघात