शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:12 IST

नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर झालेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने हटवून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नाशिकरोड : नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर झालेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने हटवून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेतेबांधव सकाळी आपला व्यवसाय करतात. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांची गैरसोय होत होती. तसेच भाजीबाजारात असलेल्या अस्वच्छतेमुळे विक्रेत्यांच्या आरोग्यास बाधा निर्माण झाली होती. याबाबत नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी या संस्थेच्या वतीने मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांना १५ दिवसांपूर्वीच याबाबत निवेदन दिले होते. मात्र तरीदेखील मनपा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.मनपा विभागीय कार्यालयात मंगळवारी यासंदर्भात ठिय्या आंदोलन करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेते सुनील मगर, महेश कुलथे, भारत माळवे, बाळासाहेब चंद्रमोरे, हेमंत पोटे, किशोर सोनवणे, गौतम सोनवणे, इस्माईल पठाण, मनोहर खोले, उल्हास कुलथे, विजय सोनार, हर्षल ठोसर आदी एकत्रा आले होते. विभागीय अधिकारी नितीन नेर व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे जनार्दन घंटे यांनी वृत्तपत्र विक्रेता बांधवांशी चर्चाकरून उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविले.मनपा अधिकारी अतिक्रमण काढत असताना त्या ठिकाणी अतिक्रमण केलेल्या विक्रेत्याने वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांना शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत वृत्तपत्र विक्रेते इब्राहिम इस्माईल खान यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांना धमकावणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी केली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका