शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:50 PM

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून धार्मिकस्थळे हटविण्यात आली, परंतु वाहतुकीस अडथळा ठरणाºया व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण केव्हा काढणार, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांनी केला आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून धार्मिकस्थळे हटविण्यात आली, परंतु वाहतुकीस अडथळा ठरणाºया व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण केव्हा काढणार, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांनी केला आहे.  नागपूरच्या धर्तीवर वडाळा नाका ते पाथर्डी चौफुलीदरम्यान वडाळा-पाथर्डी रस्ता करण्यात आला. त्यासाठी लाख रुपये महापालिकेने खर्च केले. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस पादचाºयांसाठी पदपथ रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात येऊन वाहतुकीवर नियंत्रण राहावे म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजकही टाकण्यात आले.  तसेच दुभाजकामध्ये खजुराचे आणि शोभिवंत वृक्ष लावल्याने सौंदर्यात भरच पडली. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल, असे वाटले होते. परंतु काही काळ गेला आणि शिवाजीवाडी ते पांडवनगरी, वडाळा-पाथर्डी लगतच्या दोन्ही बाजूला काही व्यावसायिकांनी पत्र्याचे शेड आणि पक्के बांधकाम करून ओटे बांधून अतिक्रमण केल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली वाहने सर्रासपणे रस्त्यावरच लावतात, त्यामुळे वाहनधारकांना आणि पादचाºयांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच लहान-मोठे अपघात घडून हमरी-तुमरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीसाठी आहे की व्यावसायिकांसाठी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच शिवाजीवाडी, विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, कलानगर, सदिच्छानगर, सराफनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ सुरू असते. परंतु व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.  जॉगिंग ट्रॅक ते शंभरफुटी रस्ता, मोदकेश्वर चौक ते बापू बंगला, श्रीराम चौक ते राणेनगर चौफुली या परिसरात अंतर्गत व मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी पत्र्याचे शेड आणि पक्के बांधकामाचे ओटे बांधून अतिक्रमण केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाtraffic policeवाहतूक पोलीस