शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

गोविंदनगर-सिटी सेंटर मॉल रस्त्यावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:21 PM

गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : अपघातात वाढ; नागरिक संतप्त

सिडको : येथील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर येथील अतिक्रमणात अधिक भर पडली असून, यामुळे याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातही होत आहे. याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अतिक्रमणात वाढ होत आहे.सिडको भागातील मुख्य रस्त्यावर तसेच मुख्य चौक असलेल्या ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्त्याने चालणे मुश्कील होत असतानाच आता गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरदेखील मोठ्या अतिक्रमण झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर, उंटवाडी, अंबड परिसर यांसह संपूर्ण सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. फळविक्रेते, भाजीपाला व्यावसायिक याबरोबरच विविध व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने रस्त्याने वाहन चालविणेमुश्कील होत असून,यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने याबाबत दखल घेत रहदारीस अडथळ ठरणारे अतिक्रमण हरविण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.साइडपट्ट्यांवर पालापाचोळागोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणारा मुख्य रस्ता हा प्रशस्त करण्यात आला असून, रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये सुशोभिकरणही करण्यात आले आहे. परंतु याच रस्त्याच्या साइटपट्ट्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा, तसेच झाडांच्या फांद्या पडलेल्या असून, याचीही स्वच्छता मनपाने करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.नागरी समस्यांत वाढतत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात नागरिकांना मनपाशी संबंधित भेडसावणाºया समस्यांचा निपटारा व्हावा यासाठी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम हाती घेतला होता. यात आयुक्त स्वत: नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात घेत त्या संबंधित अधिकाºयांकडून सोडवून घेत होते. यामुळे सिडको भागातील अनेक नागरी समस्या मार्गी लागत होत्या. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर नागरी समस्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याबाबत सिडको परिसरातील नागरिकांत नाराजी आहे़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण