शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण विभागाचा वंचितांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:02 IST

शहरातील वाहतुकीला अडथळा करणारे किंवा विनापरवाना रस्त्यावरच मंडई थाटणारे भाजीविक्रेत्यांवर महापालिका कारवाई करते आणि त्यांचे साहित्यही जप्त करते.

नाशिक : शहरातील वाहतुकीला अडथळा करणारे किंवा विनापरवाना रस्त्यावरच मंडई थाटणारे भाजीविक्रेत्यांवर महापालिका कारवाई करते आणि त्यांचे साहित्यही जप्त करते. त्यामुळे दरवेळी रोषाचा धनी ठरणारे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून मात्र वेगळीच समाजसेवा केली जात आहे. जप्त केलेला भाजीपाला आणि अन्य साहित्य नाशिकमधील निराधार आणि वंचितांच्या संस्थेसाठी मदत म्हणून दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही चर्चेशिवाय ही मदत दिली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या दृष्टीने नाराजीचा विषय असलेले हा विभाग मात्र सेवाभावी संस्थांच्या दृष्टीने कृतज्ञतेची भावना वाढविणारा ठरत आहे.अतिक्रमण विभाग हा शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न करीत असला तो कायम वादाच्या भोवऱ्यात असतो.  कधी अतिक्रमण हटवले नाही म्हणून नागरिक चिरिमिरीचे आरोप करतात, तर कधी अतिक्रमण हटविल्यानंतर फेरीवालेही त्यांच्यावर आरोप करतात. त्यात प्रमुख तक्रार जप्त केलेल्या मालाची असते. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई करताना भाजीपाला, फळे जप्त करतात, त्यावर आराडाओरड होते.  कित्येकदा जप्त मालाचे पुढे  काय होते  याविषयी सामान्य नागरिकांनादेखील कुतूहल किंवा शंका असते. मात्र, नाशिक महापालिकेच्या वतीने हा माल शहरातील विविध सेवाभावी संस्था तसेच वंचितांचा सांभाळ करणाºया संस्था तसेच शासकीय वसतिगृहांना दिला जातो.गरजवंतांकडून कृतज्ञता...शहरातील अभिक्षणगृह (रिमांडहोम), रमाबाई आंबेडकर वसतिगृह, त्याचप्रमाणे वृद्धाश्रम, अंध-अपंगांचा सांभाळ करणाºया संस्था यांना हा माल दिला जातो आणि किती तसेच कोणता माल दिला, याबाबतदेखील लेखी घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडून अशाप्रकारची मदत दिली जात असून, त्यासंदर्भातील नोंदी दफ्तरी दाखल असल्याचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी सांगितले. महापालिकेच्या या सहकार्यामुळे अनेक गरजवंत आणि वंचितांना आधार मिळतो.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण