शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सिडको परिसरातील अतिक्रमण हटणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:54 IST

सिडको भागातील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारे, ड्रेनेज लाइन तसेच पाण्याच्या पाइपलाइनच्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाबरोबरच सिडको भागातील अनधिकृतपणे केलेले बांधकाम नियमानुसार हटविले जाईल. त्यात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

सिडको : सिडको भागातील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारे, ड्रेनेज लाइन तसेच पाण्याच्या पाइपलाइनच्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाबरोबरच सिडको भागातील अनधिकृतपणे केलेले बांधकाम नियमानुसार हटविले जाईल. त्यात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.  सिंहस्थनगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात शनिवारी (दि.१९) सकाळी ‘वॉक विथ कमिशनर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण १३४ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात सिडको भागातील अतिक्रमण, गटारी तुंबणे, पावसाचे पाणी घरात शिरणे, गल्लीबोळातील तसेच उद्यानांमधील अतिक्रमण काढणे आदी समस्यांचा समावेश होता. यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत काही तक्रारींचा तेथल्या तेथे निपटारा केला तर काही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी महापालिकेच्या सुधारित अ‍ॅपवर आपल्या समस्या मांडून आपला वेळ व खर्च वाचविण्याचेही त्यांनी आवाहन केले. शहरात कचरा होणार नाही, याची सुरुवात स्वत:पासून करा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा, कुणी घाण करत असेल तर संबंधितांच्या नावानिशी तक्र ार करा, असेही आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे संभाजी स्टेडिअमचा जास्तीत जास्त वापर हा खेळासाठी होणे अपेक्षित असून, सदर मैदान कोणत्याही कार्यक्र माला देणे टाळावे, अशीही त्यांनी सूचना केली. दरम्यान, नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता आयोजित केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही, त्यामुळे हा कार्यक्र म सुरूच राहणार असल्याचेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठामपणे स्पष्ट केले.आयुक्तांनी सुनावले...वॉक विथ कमिशनर कार्यक्रमात अनेकांनी आयुक्तांकडे तक्रारी मांडल्या. यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनीही तक्रारी मांडल्या असता आयुक्तांनी त्यांना खडे बोल सुनावल्याने संबंधितांनी घाबरत घाबरतच प्रश्न विचारले तर काहींनी टोकन घेतल्यानंतरही आयुक्तांसमोर न जाता कार्यक्रमातून काढता पाय घेतला. दरम्यान, खेळण्याचे मैदान असताना ते खेळाव्यतिरिक्त इतर खासगी कार्यक्रमासाठी देताना तयार करण्यात आलेल्या नियमावलीप्रमाणेच भाडेतत्त्वावर द्यावे. तसेच वर्षभरातून केवळ ३० ते ४० दिवसच खासगी कार्यक्रमासाठी देता येत असल्याने अधिकाऱ्यांनीही त्याचे भान ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका