शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
4
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
5
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
6
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
7
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
8
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
9
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
10
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
11
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
12
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
14
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
15
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
16
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
17
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
18
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
19
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
20
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

महापालिकेत नोकरभरती

By admin | Updated: December 31, 2016 00:24 IST

अत्यावश्यक सेवा : शासनानंतर महासभेचा हिरवा कंदील

नाशिक : अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता सरळसेवेकरिता रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेनेही वैद्यकीय अधिकारी व अभियंता तसेच मिस्तरी या एकूण ६५ पदांची भरती करण्यास हिरवा कंदील दाखविला.  महापालिकेच्या महासभेत आयुक्तांकडून सदर भरतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. एकीकडे दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे प्रमाण वाढत असताना आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे नोकरभरतीस मनाई आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे अत्यावश्यक सेवांवर मात्र मोठ्या प्रमाणावर ताण पडत असल्याने प्रशासन चिंतीत आहे. त्यामुळे, महापालिका प्रशासनाने अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे विशेष बाब म्हणून दि. २० एप्रिल व २१ मे २०१६ रोजी प्रस्ताव पाठविला होता आणि आस्थापना खर्चाच्या मर्यादेतून शिथिलता देऊन महापालिकेस नोकरभरतीची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही रिक्त पदे अत्यावश्यक बाब म्हणून भरती करण्याचा प्रस्ताव दि. १ जून २०१६ रोजी सादर करण्यात आला होता. त्यानुसार, शासनाने वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्तरी या एकूण ६५ पदांसाठी सरळ सेवेने भरती करण्यास परवानगी दिली होती.सदर भरतीचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत ठेवण्यात आला असता, महापौर अशोक मुर्तडक यांनी त्यास कोणत्याही चर्चेविना हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३२, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ४, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३, कनिष्ठ अभियंता (विद्युत) २ आणि मिस्तरी १४ अशी एकूण ६५ पदे सरळ सेवेने भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, महासभेत, नगरचना विभागाच्या सर्वेक्षण कामासाठी सल्लागार सर्वेक्षक एजन्सीची नेमणूक करणे आणि नगररचना विभागातील मार्च २०१७ पर्यंतच्या सर्वेक्षण कामासाठी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यासही महासभेने मंजुरी दिली.