शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या संगणकावर कर्मचारीच करतात काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:32 IST

विभागीय अधिकाऱ्यांच्या संगणकावर पासवर्ड टाकून अन्य कर्मचारी करतात काम आणि संबंधित अधिकाºयांना संगणकाचे ज्ञान तर नाहीच, परंतु माउसही धरता येत नाही,

इंदिरानगर : विभागीय अधिकाऱ्यांच्या संगणकावर पासवर्ड टाकून अन्य कर्मचारी करतात काम आणि संबंधित अधिकाºयांना संगणकाचे ज्ञान तर नाहीच, परंतु माउसही धरता येत नाही, असा प्रकार आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या भेटीत शनिवारी (दि.२०) आढळला. त्यामुळे आयुक्तांनी पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांना धारेवर धरले.शनिवारी (दि. २०) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्त गमे यांनी अचानक भेट दिली. यावेळी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या कक्षातील संगणकावर कर्मचारी काम करीत होता त्यामुळे सोनवणे यांनी संगणकावर तुम्ही पासवर्ड देऊन अन्य कर्मचाºयांकडून काम करून घेतात काय अशी विचारणा केलीच, परंतु संगणक आॅपरेट करून दाखवा, असे सांगून थेट परीक्षाच घेतली; परंतु सोनवणे यांना ते करता आले नाही. आयुक्तांनी त्यावर मॅडम साधा तुम्हाला माउससुद्धा धरता येत नाही तर तुम्ही काम काय करणार, अशी विचारणा करीत आयुक्तांनी खरडपट्टी काढली.दरम्यान, घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील आयुक्तांनी भेट दिली तेव्हा तेथील कर्मचारी बसून होते तुम्ही काय करता असा प्रश्न करीत पाणीपट्टी वसूल करा आणि थकबाकीदारांचे नळ पुरवठा बंद करा असे आदेश देतानाच कार्यालयातील अतिरिक्त कर्मचाºयांनाही घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी बाहेर पाठवा, असे विभागीय अधिकाºयांना सांगितले. तसेच प्रत्येक विभागात आवक-जावकसाठी कर्मचारी असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व विभाग मिळून एकच कर्मचारी ठेवा, असेही महापालिका आयुक्त गमे यांनी बजावले.अधिकाºयांना खडसावलेविवाह नोंदणी विभागात कर्मचाºयाच्या ऐवजी शिपाई काम करत असताना दिसून आल्याने कर्मचारी कुठे गेले, शिपायांचे शिपायांना काम करू द्या असे खडसावले. तसेच यानंतर विभागीय कार्यालयालगत असलेल्या जिजामाता रु ग्णालयात भेट दिली. सर्व विभागाची पाहणी केली. त्यांच्या समवेत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.कार्यालयातील अतिरिक्त कर्मचाºयांनाही घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी बाहेर पाठवा, असे विभागीय अधिकाºयांना सांगितले. तसेच प्रत्येक विभागात आवक-जावकसाठी कर्मचारी असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.कर्मचारी  व्हॉट्स अ‍ॅपमध्ये  व्यस्तविद्युत विभागात आयुक्तांनी दिलेल्या भेटीच्या वेळी तेथील कर्मचारी मोबाइलवर व्हॉट्स अ‍ॅप बघत टाइमपास करत असताना दिसून आल्याने कर्मचारी मोबाइल खेळण्यात व्यस्त असतात का? असा प्रश्न विचारला. तसेच रेकॉर्ड रूमला पाच ते सहा कर्मचारी होते त्यांना विचारणा केली असता तुम्ही काय करता तर त्यांनी असे उत्तर दिले आम्ही जुने रेकॉर्ड बघत आहे, त्यावर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व कर्मचारी रेकॉर्ड बघताय का अशी विचारणा केली सदर इमारत पुरातन असून तिचे जतन करा, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, भिंतीवर गवत व पिंपळाचे झाड आलेले पाहून त्यांनी देखभालीकडे लक्ष देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक