विजेच्या खांबावरून पडून कर्मचारी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:53 PM2021-01-13T18:53:29+5:302021-01-13T18:53:29+5:30

चांदवड : इलेक्ट्रीक खांबावर काम करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कामगाराचा तोल गेल्याने खांबारुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Employees seriously injured after falling from a power pole | विजेच्या खांबावरून पडून कर्मचारी गंभीर जखमी

विजेच्या खांबावरून पडून कर्मचारी गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देतारा बदलण्याचे काम वीज पुरवठा सुरु असतांना चालु होते असे समजते.

चांदवड : इलेक्ट्रीक खांबावर काम करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कामगाराचा तोल गेल्याने खांबारुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

चांदवड-मनमाड रस्त्याचे काम सुरु आहे. त्या कामामध्ये चांदवड सब-स्टेशनसमोर रस्त्यावरुन वीजेच्या तारा व लाईन क्रॉस असल्याने ती बदलण्याचे काम सुरू असतांना बुधवारी (दि.१३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलवर काम करीत असलेला कामगार विश्वनाथ नागेश्वरसिंग (रा. चांदवड) हा पोलवरून पडून जबर जखमी झाला. त्यास नागरीकांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हे तारा बदलण्याचे काम वीज पुरवठा सुरु असतांना चालु होते असे समजते. याबाबत चौकशी मागणी होत आहे.

Web Title: Employees seriously injured after falling from a power pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.