शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मानधनावरील कर्मचाऱ्यांना  कायम करण्याचा घाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:38 IST

नाशिक बाजार समितीच्या ई-नाम कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मागच्या दाराने कायम करण्याचा घाट घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या सचिवांना पत्र पाठवून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : नाशिक बाजार समितीच्या ई-नाम कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मागच्या दाराने कायम करण्याचा घाट घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या सचिवांना पत्र पाठवून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या कर्मचाºयांना मुदत संपूनही मार्केटच्या सेवेत कायम ठेवल्याने आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार मार्केटच्या संचालकांनीच केली आहे.गेल्या वर्षी शासनाने बाजार समित्यांचे कामकाज ई-नाम पद्धतीने करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यासाठी बाजार समितीत दररोज होणारी उलाढाल, शेतमालाचे भाव, लिलावाची माहिती आॅनलाइन पद्धतीने भरण्यासाठी नाशिक बाजार समितीने दहा कंत्राटी कर्मचाºयांची सहा महिन्यांसाठी नेमणूक केली होती. मानधनावर नेमलेल्या या कर्मचाºयांची मुदत संपुष्टात आल्यावर त्यांना परत पाठविणे क्रमप्राप्त असताना बाजार समितीचे अध्यक्ष व काही संचालकांनी या कर्मचाºयांना बाजार समितीच्या सेवेत कायम करण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले असल्याची तक्रार बाजार समितीचे विश्वास चिंतामण नागरे यांच्यासह सात संचालकांनी थेट जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. मुळात बाजार समितीचे ई-नाम कामकाज पूर्ण क्षमतेने होत नसून, त्यात कर्मचाºयांना कायम करण्याच्या निर्णयाची माहिती संबंधितांनी अन्य संचालकांना दिली नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.१८ जानेवारी २०१८ च्या आदेशान्वये सहा महिन्यांसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्यांच्यावर केल्या जाणाºया खर्चामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याने जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी बाजार समितीच्या सचिवाला पत्र पाठवून संचालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.कायम करण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरूबाजार समितीत दररोज होणारी उलाढाल, शेतमालाचे भाव, लिलावाची माहिती आॅनलाइन पद्धतीने भरण्यासाठी नाशिक बाजार समितीने दहा कंत्राटी कर्मचाºयांची सहा महिन्यांसाठी नेमणूक केली होती. मानधनावर नेमलेल्या या कर्मचाºयांची मुदत संपुष्टात आल्यावर त्यांना परत पाठविणे क्रमप्राप्त असताना बाजार समितीचे अध्यक्ष व काही संचालकांनी या कर्मचाºयांना बाजार समितीच्या सेवेत कायम करण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले असल्याची तक्रार बाजार समितीचे विश्वास चिंतामण नागरे यांच्यासह सात संचालकांनी थेट जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डNashikनाशिक