हिरावाडीरोड : नागरीकांचा आरोपपंचवटी : महापालिका प्रशासनाकडून सर्वच कामे नियमित आणि प्राधान्याने केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रस्ते सफाईचे काम करणार्या कर्मचार्यांकडून दुजाभाव केला जात असल्याचे चित्र हिरावाडीरोड परिसरात दिसुन येत आहे. हिरावाडीरोडवर महापालिकेचे कर्मचारी दैनंदिन रस्ता सफाईचे काम करतात मात्र तेथून पुढे असलेल्या हिरावाडी भागात मुख्य रस्त्यालगतच्या दुभाजकालगत साफसफाई करतांना दिसुन येत नाही. अशीच परिस्थिती अन्य भागात दिसुन येते. परिसरातील एका कॉलनीत घंटागाडी येते तर दुसर्या कॉलनीत घंटागाडी जातच नाही परिणामी महिलांना रस्त्यालगत कचरा आणून टाकावा लागतो. रस्त्यालगत असलेल्या दुभाजकाजवळ साचलेली माती तसेच झाडाचा पालापाचोळा स्वच्छ करण्याचे काम कर्मचार्यांना सांगावे लागत नाही ते दैनंदिन करतात मात्र अन्य भागातील रस्त्यालगत साचलेली माती व कचरा उचलण्याचे काम सांगावे लागत असल्याने कर्मचारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. (वार्ताहर)
रस्ते सफाई कामाला कर्मचार्यांचा दुजाभाव
By admin | Updated: May 20, 2014 00:29 IST