नाशिक : सुमारे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतन कराराची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी करीत सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांमधील कर्मचारी आणि अधिकारी बुधवार, दि. १२ रोजी लाक्षणिक संपावर जात आहेत. या संपामुळे बुधवारी बॅँकांचे कामकाज ठप्प होणार आहे.देशातील राष्ट्रीयीकृत बॅँकांमधील वेतनवाढीचा करार हा सुमारे दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. मागील संपुआ सरकारने याबाबत काहीच हालचाल केलेली नव्हती. नुकत्याच सत्तेवर आलेल्या भाजपाच्या सरकारने प्रारंभी काही सकारात्मक गोष्टी केल्या असल्या, तरी कर्मचारी संघटनांबरोबरच्या नंतरच्या बैठकांमध्ये ताठर भूमिका घेतल्याने वेतनवाढीसाठी संप करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचे बॅँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.या संपामुळे देशभरातील राष्ट्रीयीकृत बॅँकांमधील कामकाज बुधवारी ठप्प होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवहारही होऊ शकणार नसल्याने बॅँक ग्राहकांची अडचण होणार आहे. (प्रतिनिधी)
बॅँकांमधील कर्मचारी लाक्षणिक संपावर
By admin | Updated: November 10, 2014 00:37 IST