शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोरोनाबाबतचे गैरसमज दुर करण्यावर भर: डॉ. हेमंत सोननीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 23:50 IST

नाशिक- सध्या कोरोना रोगाचे मोठे आव्हान उभे आहे. रोगाचे गांभिर्य आहेच, परंतु अनेक प्रकारचे गैरसमज आहेत यासंदर्भात इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने नागरीकांमध्ये खास प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली.

ठळक मुद्देडॉक्टरांची कार्यशाळा घेणारनागरीकांचे प्रबोधन करणार

नाशिक- सध्या कोरोना रोगाचे मोठे आव्हान उभे आहे. रोगाचे गांभिर्य आहेच, परंतु अनेक प्रकारचे गैरसमज आहेत यासंदर्भात इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने नागरीकांमध्ये खास प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली. डॉ. हेमंत सोननीस यांची नुकतीच आयएमएच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली असून १ एप्रिलपासून ते पदभार स्विकारतील. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेली बारा वर्षे ते कार्यरत आहेत. नव्या जबाबदारी संदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न- सध्या राज्यात कोरोनाचे आव्हान असताना अध्यक्षपद मिळाले आहे काय वाटते ?डॉ. सोननीस: सध्या कोरोनाचे मोठे आव्हान आहे. राज्यात आणि देशात अनेक उद्योग, व्यवसाय, मॉल्स, शाळा महाविद्यालये बंद ठेवून संसर्ग टाळला जात असताना वैद्यकिय व्यवसायिक मात्र जोखीम पत्करून सेवा देत आहेत. हे विशेष आहे. सध्या रोगराईमुळे अनेक प्रकारच्या चर्चा पसरल्या आहेत. या आजाराविषयी वैद्यकिय व्यवसायिकांना नेमकी माहिती मिळावी यासाठी लवकरच एक कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नागरीकांमधील गैरसमज दुर करावे यासाठी देखील पोस्टर बॅनर तयार केले जात आहेत. त्यातून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.प्रश्न: अलिकडे सार्वजनिक स्वच्छता हा विषय नागरीकांकडून दुर्लक्षीत आहे असे वाटते का?डॉ. सोननीस : कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी जाण्याची पध्दती आहे. परंतु आजार होऊ नये यासाठी नागरीकांनीच काळजी घेण्याची गरज आहे. घरातील कचरा अथवा कुठे थुंकणे हे देखील आजारांना निमंत्रण देऊ शकते त्यामुळे आधी सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला पाहिजे. अर्थातच कोणी अशाप्रकारे अस्वच्छता होणार नाही याची काळजी स्वत:पासूनच घेतली पाहिजे. घरापासून सुरवात केली तर समाजापर्यंत त्याची व्यापकता वाढेल.प्रश्न: आयएमएचे अध्यक्ष म्हणून प्राधान्य कशाला राहील?डॉ. सोननीस : कोरोनासंदर्भात सध्या प्राधान्याने वैद्यकिय व्यवसायिकांची कार्यशाळा घेतली जाईल. त्यानंतर अन्य प्रश्नांकडे लक्ष पुरवले जाईल. शासकिय- निमशासकिय संस्थांचे नियम अत्यंत जटील असून त्यामुळे वैद्यकिय व्यवासयिकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यातून शासकिय यंत्रणांच्या समन्वयाने मार्ग काढण्यावर भर असेल. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यातील संबंध सामंजस्याचे असावेत आणि डॉक्टरांवरील हल्ले टळावेत या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोनाMedicalवैद्यकीयHealthआरोग्य