शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्षमतेपेक्षा अधिक वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 04:30 IST

नंदुरबारची जाहीर सभा आटोपून नाशिक मुक्कामी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादला घेऊन जाणाºया हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने शनिवारी सकाळी टेक आॅफनंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

नाशिक : नंदुरबारची जाहीर सभा आटोपून नाशिक मुक्कामी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादला घेऊन जाणाºया हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने शनिवारी सकाळी टेक आॅफनंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.हेलिकॉप्टरची इंधनाची टाकी पूर्ण भरलेली होती. त्यातच मुख्यमंत्र्यांचे खानसामा (कुक) सोबत असल्याने अधिक वजन झाले. पायलटने २० फुटावरून हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरविले व खानसामाला उतरवून १५ मिनिटांनी मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना झाले. याआधी तीन वेळा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अतिवजनाने तर तांत्रिक बिघाडाने टेक आॅफनंतर खाली उतरावे लागले आहे.शुक्रवारी नंदुबारची जाहीर सभा आटोपण्यास उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्री रात्री कारने नाशिकला आले होते. ते तेथेच मुक्कामी थांबले होते. मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे कार्यसन अधिकारी अभिमन्यू पवार व खानसामा सतीश कानेकर व दोन पायलट असे सहा जण हेलिकॉप्टरमध्ये होते.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर २५ मे रोजी लातूरमध्ये टेक आॅफ केल्यानंतर सुमारे २५ फुटांवरून कोसळले होते.७ जुलै रोजी रायगड येथे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी मुख्यमंत्री जात असतानाच त्याने टेक आॅफ केले होते.गंभीर मुद्दा नव्हे...इंधनाच्या समस्येमुळे चारच प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती. त्यांचे हेलिकॉप्टर सहा प्रवासी क्षमतेचे होते. फडणवीस व महाजन यांच्यासह तीन प्रवाशांना घेऊन औरंगाबादचा हवाई प्रवास करणे सुरक्षित राहील, असा निष्कर्ष पायलटने काढल्यामुळे त्यांनी विनंती करत हेलिकॉप्टर पुन्हा उतरविले. फडणवीस यांच्यासह महाजन व पायलट सुखरूप औरंगाबादला पोहचले. हा दैनंदिन सरावाचा भाग असून इतका गंभीर मुद्दा नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र