नाशिक : सलग दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिले असले तरी, जमीनदोस्त झालेल्या पिकांचे दृष्य स्वरूपातील नुकसानीचा अंदाज बांधणे यंत्रणेला शक्य आहे, मात्र अवकाळी पावसामुळे विलंबाने होणाऱ्या नुकसानीचा अंदाज बांधणे अशक्य असल्याने पंचनामे सदोष होण्याची भीती खुद्द यंत्रणेनेच व्यक्त केली आहे. जिल्'ात शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने अकरा तालुक्यांतील शेती पिकांना त्याचा फटका बसला आहे. नाशिकप्रमाणेच अन्य जिल्'ातही अवकाळी पावसाने मोठे नुकसान केल्याने या नुकसानीचा अंदाज बांधणे व नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देता येणे शक्य व्हावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय यंत्रणेला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या आदेशाबरहुकूम नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही तलाठी, कृषी सहायकांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याने सोमवारपासून पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यात शेतात उभ्या असलेल्या व अवकाळी पावसाने आडव्या पडलेल्या शेती पिकाचेच पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश आहेत. अशा पिकांचे छायाचित्र व ध्वनीचित्रफितही काढली जावी, अशी सक्ती करण्यात आल्याने नेमका हाच मुद्दा पंचनाम्यांसाठी अडथळा ठरला आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागा पूर्णत: उद््ध्वस्त झाल्या, तर काही बागांना त्याचा फटका बसला आहे. साधारणत: आठ ते दहा दिवसांनी द्राक्ष मण्यांना तडे पडण्याची क्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.
तातडीचे पंचनामे सदोष होण्याची भीती नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण : यंत्रणाच साशंक
By admin | Updated: March 4, 2015 01:01 IST