शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

काजव्यांच्या झगमगाटाची पर्यटकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:13 IST

घोटी : धरतीला मान्सूनची चाहुल लागली असून, काजव्यांच्या चकमक चंदेरी दुनियेने भंडारदरा परिसर उजळून निघाला आहे. येथील हिरडा, बेहडा, सादडा वृक्षांवर काजवे नृत्य करताना दिसत असून, या प्रकाशमयी तारकांचे आगमन म्हणजेच मान्सून आल्याचा संकेत असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगितले जात आहे.

ठळक मुद्देभंडारदरा : निसर्गाचा अद्भुत नजारा; मान्सूनचे लवकरच आगमन

घोटी : धरतीला मान्सूनची चाहुल लागली असून, काजव्यांच्या चकमक चंदेरी दुनियेने भंडारदरा परिसर उजळून निघाला आहे. येथील हिरडा, बेहडा, सादडा वृक्षांवर काजवे नृत्य करताना दिसत असून, या प्रकाशमयी तारकांचे आगमन म्हणजेच मान्सून आल्याचा संकेत असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगितले जात आहे.काजव्यांचे भंडारदरा अभयारण्यात आगमन झाले असून, कळसूबाई, हरिश्चंद्र अभयारण्याच्या अनेक वृक्षराजींवर हे मनमोहक मायावी दुनियेने अधिराज्य गाजवत आहेत. संपूर्ण जंगल जणू रोषणाईने उजळल्याचे दृश्य नजरेस अनुभवयास येत आहे.काजवामहोत्सवाचे भंडारदरायेथील कळसूबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्य, वन्यजीव विभागाने भंडारदरा येथे आयोजन केले आहे.हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा मोजक्याच झाडांवर काजव्यांचा काही दिवसांचाच ‘बसेरा’ असतो. आदिवासी खेड्यांच्या शिवारातली सहस्रावधी झाडे अक्षरश: कोट्यवधी काजव्यांनी लगडून गेली आहेत. ज्या विशिष्ट झाडांवर काजवे वस्तीला आलेले आहेत, ती झाडे सिमस ट्रीसारखी दिसताहेत ! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजव्यांची आरास केली आहे. त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालत आहेत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरू आहे. एका लयीत, तालात अन् सुरातही ! आपण बघितलं ते दृश्य आणखीन कोणाला दाखवण्याच्या हेतूने हातातले मोबाइल किंवा डिजिटल कॅमेरे फोटोसाठी पुढं सरसावतात. काजवे काही कॅमेऱ्यांना बधत नाहीत, ते काही केल्या जेरबंद होत नाहीत ! आम्हाला बघायचंय तर तुमचे डोळे हेच जगातलेउत्तम कॅमेरे आहेत, असेच जणू काजवे आपल्याला सांगताहेत. लखलख तेजाची ती चंदेरी दुनिया बघताना आपण धरणीवरचा स्वर्ग पाहात असल्याची भावना मात्र आपल्या मनाला आत आतपर्यंत सुखावत राहते...भंडारदºयाच्या वनामधील काजवामहोत्सव अनुभवण्यासाठी असंख्य निसर्गप्रेमी दाखल झाले असून, अनेक मोठमोठी हॉटेल्स सजली आहेत. आदिवासी पट्ट्यामध्येही बºयाच ठिकाणी स्वादिष्ट असे जेवण देण्यासाठी स्थानिक तरु ण सरसावले आहेत. ग्रामीण भागातील लोकनृत्याची कला ही या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ व नाशिक येथील ट्रॅव्हल्स असोसिएशनने या काजवा-प्रेमींंसाठी आयोजित केली आहे. भंडारदरा म्हटलं की, पर्यटकांना आठवण येते जलोत्सवाची. परंतु याच भंडारदºयाच्या निसर्गात अजूनही खूप काही दडलेले आहे याची पारख भंडारदºयाच्या वनविभागाने नेमकी हेरली. पावसाच्या आगमनाच्या अगोदर काजव्यांची मायावी दुनिया वनसाम्राज्यात कसे राज्य करते हे निसर्गप्रेमींच्या मनावर बिंबविले. काजव्यांचा हा निसर्गरूपी आविष्कार पुढे काजवामहोत्सव या नावाने उदयास आणला. या काजवारूपी प्रकाशफुलांचा जंगलामध्ये झाडावर चाललेला पाठशिवणीचा खेळ पाहण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक या प्रमुख शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर परराज्यातूनही अनेक निसर्गप्रेमी आसुसलेले आहेत.