येवला : अंगुलगाव येथील गावाच्या पूर्व भागात असलेला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी पाझर तलावात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे यांच्या हस्ते मच्छबीज सोडण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रविण गायकवाड यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.अंगुलगाव येथील आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहासाठी गावोगावी भटकंती करावी लागते. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाझर तलावात पाणी आले नाही. या वर्षी वरु न राजाच्या कृपेने पुर्वभागातपाझर तलावात ४० टक्के पाणी आले आहे. त्यामुळे येथील आदिवासी कुटुंबांनी रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रविण गायकवाड यांनी आपल्या गटातील आदिवासी बांधवांचे स्थलांतर होऊ नये. त्यांच्या हाती काम मिळावे यासाठी मच्छशेती करण्याचे आवाहन केले आहे. आदिवासी बांधवांचा पारंपारिक व्यवसाय हा मच्छमारीचा असल्याने त्यांना हि कला उपजत ज्ञान असते. त्यामुळे हा व्यवसाय करणे सोपे जाते.४ महिने गावात शेतावर कामाला जाऊन आपला उदरिनर्वाह आपल्या कुटुंबांसह ते करु शकता. ६ महिने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेत मजुरी करु न आदिवासी कुटुंबाचे पोट भरु शकते. परंतु ६ महिन्यानंतर शेतीची कामे आटोपल्या नंतर त्यांच्या हाती काम नसते. तेव्हा ४ महिन्यापुर्वी टाकलेले मासे १ किलोपर्यंत झालेले असतात. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करणे कठीन जात नाही. पर्यायाने कामासाठी गाव सोडावे लागत नाही. याप्रसंगी राजेंद्र झाल्टे, पुंजाराम गायकवाड, गणेश सोनवणे, कचरु जगझाप, चेअरमन परमानंद जाधव, कैलास काळे, पांडूरंग लांडगे, रामदास दळवी, सुभाष जगझाप, पोलीस पाटील समाधान पवार, अनिल पवार, छबू गायकवाड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
मच्छबीज सोडले : स्थानिक आदिवासाना मिळणार रोजगार
By admin | Updated: July 25, 2016 23:38 IST