शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

व्याधीजर्जर गोवंशावर मायेची पखरण...

By admin | Updated: October 16, 2015 23:57 IST

व्याधीजर्जर गोवंशावर मायेची पखरण...

‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीचा प्रत्यय गायींबाबत प्रकर्षाने येतो. गाय दुभती न राहिल्याने कित्येक जण तिची रवानगी एकतर कत्तलखान्यात करतात वा तिला घराबाहेर तरी काढतात. आयुष्याच्या सायंकाळी व्याधीजर्जर झालेल्या या गायींची सुश्रुषा करणे किती अवघड काम असते, याची कल्पना कुणालाही यावी; पण पंचवटीतील रूपाली जोशी हे काम सतरा वर्षांपासून अव्याहत आणि निष्ठेने करीत आहेत. जोशी यांना लहानपणापासून प्राण्यांविषयी प्रेम. १९९८ मध्ये त्यांनी योगायोगाने तपोवनातील कृषी गोसेवा ट्रस्ट या संस्थेत काही दिवस काम केले. त्या गोवंशाची मनापासून करीत असलेली सेवा पाहून पुढे त्यांच्यावरच ही जबाबदारी पूर्णवेळ सोपवण्यात आली. या ट्रस्टच्या व्यवस्थापक म्हणून जोशी काम पाहत आहेत. ट्रस्टच्या गोशाळेत अडीचशे गायी, गोऱ्हे व बैल आहेत. गायीने दूध देणे बंद केल्यावर वा बैल म्हातारा झाल्यानंतर लोक त्याची रवानगी कत्तलखान्याकडे करतात किंवा त्यांना रस्त्यावर सोडून देतात. रस्त्यावर सोडलेली गुरे महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक उचलून दहा दिवस कोंडवाड्यात ठेवते. गुराचा मालक न आल्यास गुरांना या गोशाळेत पाठवले जाते. अशा गायींची रूपालीताई सेवा करतात. कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गुरांची त्या स्वत:चा जीव धोक्यात घालून सुटका करतात. गोशाळेत आणून त्यांचे पालनपोषण करतात. बऱ्याच गुरांना गंभीर आजार असतो, कोणाचा सांधा निखळलेला असतो, तर कोणाला वृद्धावस्थेमुळे जागेवरून उठणेही अशक्य असते. त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या आयुष्याची सायंकाळ सुसह्य करण्याचे काम जोशी करीत आहेत. गोशाळेत येणारी गुरे भाकड असतात. त्यांच्यापासून दूध मिळत नाही. त्यांच्यावर वारंवार उपचारही करावे लागतात. समाजाने नाकारलेल्या या गुरांना रूपालीताई माया लावतात. सकाळपासूनच त्यांचे काम सुरू होते. गुरांची पाहणी करून त्यांना हवे-नको ते पाहणे, त्यांना औषधे देणे, इंजेक्शन्स-सलाइन्स देणे, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करणे आदि जबाबदाऱ्या त्या लीलया सांभाळतात. एवढेच नव्हे, दिवसाचे चोवीस तास त्या सजग राहतात आणि कत्तलीसाठी नेणाऱ्या गायींना वाचवण्यासाठी धाव घेतात. प्राण्यांप्रति असलेल्या प्रेमापोटीच या कार्यात रमलो आहोत. गुरे मुकी असली, तरी त्यांना भावना नीट समजतात. एखादी गाय कितीही आक्रमक झाली, तरी तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवल्यास ती शांत होतेच, असा अनुभव असल्याचे जोशी सांगतात. सेवेचा हाच वसा आपण आयुष्यभर जोपासणार असल्याचाही निश्चय त्या बोलून दाखवतात. ‘समाजाकडून दुर्लक्षित गोवंशाची आपल्या हातून सेवा घडते, याचा अभिमान वाटतो. गोशाळेत आलेली गुरे मुळातच कमजोर, आजाराने ग्रासलेली असतात. अशा गोवंशाचे मरण सुसह्य करण्याचे काम आपल्या हातून घडते, याचे समाधान वाटते’, असे जोशी सांगतात. क्षुल्लक कारणावरून माणसा-माणसामध्ये वैर भडकण्याच्या सध्याच्या काळात गुरांना माया लावणारी अशी व्यक्ती विरळीच!