शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मतदार यादी पुन:सर्वेक्षणा विरोधात शिक्षकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 17:21 IST

येवला : मतदार यादी पडताळणीच्या कामातून शिक्षकांना वगळावे, यासाठी येवला तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येत निवडणूक कार्यालयाविरोधात शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन देऊन काम नाकारणे बाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्देविविध अशैक्षणिक कामामध्ये शिक्षक सतत व्यस्त

येवला : मतदार यादी पडताळणीच्या कामातून शिक्षकांना वगळावे, यासाठी येवला तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येत निवडणूक कार्यालयाविरोधात शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन देऊन काम नाकारणे बाबत भूमिका स्पष्ट केली आहे.विविध अशैक्षणिक कामामध्ये शिक्षक सतत व्यस्त असून गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित होत आहेत. वेगवेगळ्या लाभाच्या योजना, आॅन लाईन कामे, विविध शैक्षणिक प्रशिक्षणे, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने, आॅन लाईन दैनिक विद्यार्थी हजेरी नोंदणी, दैनंदिन पोषण आहार व्यवस्थापन, विद्यार्थी उपस्थिती टिकवणे यांचा हंगाम बहरत असतांना त्यातच तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून इव्हीपीचे (मतदार पुन:सव्हेक्षण) हे काम कारवाईचा बडगा दाखवत शिक्षकांच्या माथी मारले जात आहे.हे काम खूप वेळखाऊ व किचकट असून प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन एकेकाची अद्ययावत माहिती, पुरावे घेऊन हायब्रीड बीएलओ अ‍ॅपद्वारे हे इव्हीपीचे काम करावे लागणार आहे. एका मतदारास १० ते १५ मिनिटे वेळ लागत असून बऱ्याचदा लिंक सर्व्हर खूप हळू चालते.याप्रसंगी शांताराम काकड, दीपक थोरात, रमेश खैरनार, नारायण डोखे, संदीप शेजवळ, नाना गोराणे, एकनाथ घुले, विजय वाघमोडे, प्रकाश साळुंखे, बाळू आहेर, विजय परदेशी, संतोष चव्हाण आदींसह तालुक्यातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी सह सर्व बी.एल.ओ. शिक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूक